मराठीमधील सुपरहिट जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे अक्षया देवधर व हार्दिक जोशी. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे अक्षया व हार्दिक यांची ओळख झाली. ऑनस्क्रीन या जोडीला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळाली. रिल लाईफमध्ये अक्षया व हार्दिकच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. खऱ्या आयुष्यातही या दोघांची मनं जुळली. दोघांनीही लग्न करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता लग्नानंतरचा प्रत्येक क्षण दोघंही सेलिब्रेट करत आहेत. (Hardeek Joshi On Akshaya Deodhar)
अशातच लग्नानंतर अक्षयाची पहिली मंगळागौर जोरदार साजरी करण्यात आली. या अक्षयाच्या मंगळागौर कार्यक्रमात हार्दिकही थिरकला आणि भाव खाऊन गेला. हार्दिक अक्षयाच्या मंगळागौर कार्यक्रमात मंगळागौर चे खेळ खेळला. अक्षयसोबत खेळ खेळतानाच्या त्याच्या व्हिडीओनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अक्षयाच्या पहिल्या मंगळागौरचे अनेक फोटोज व व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमात अक्षयाने तिच्या लाडक्या पतीसाठी खास उखाणा घेतला, ज्याचे सर्वांनी कौतुक केले आहे. इतकंच नव्हे तर हार्दिकनेही त्याच्या स्टाईलने अक्षयासाठी उखाणा घेतला आहे.
हार्दिकने अक्षयासाठी घेतलेला उखाणा सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. हार्दिकने चक्क पुष्पा स्टाईलने घेतलेल्या उखाण्याची चर्चा रंगली आहे. “लग्नामध्ये घातली आम्ही एकमेकांना वरमाला, अक्षयाचं नाव घेतो झुकेगा नही साला”, असा हटके अंदाजात उखाणा हार्दिकने घेतला. त्याचा हा उखाणा ऐकून अक्षयानेही हार्दिकचे कौतुक केले. त्याच्या या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिकसह अक्षयाने घेतलेल्या उखाण्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. “पावसाळा संपत आला येईल आता हिवाळा, हार्दिकरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या कार्यक्रमात छान पार पडला, मानसीचा सोहळा” असा छानसा उखाणा अक्षयाने घेताच हार्दिकसह सर्वांनी तिचं टाळ्या वाजवून कौतुक केलं आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.