हिंदी बिग बजेट सिनेमांच्या गर्दीत अगदी चौथ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर टिकून राहणारा मराठी चित्रपट म्हणजे ‘झिम्मा २’. ‘झिम्मा २’ या मराठी चित्रपटाने चित्रपटगृहात अक्षरशः धुमाकूळ घातला. प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अक्षरशः गर्दी केलेली पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील समस्त महिलावर्ग या चित्रपटाला भरभरून पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत. कोटींच्या घरात या चित्रपटाने कमाई केली आहे. (Siddharth Chandekar On Jhimma 2)
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अभिनेत्री सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सायली संजीव व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळाल्या. या कलाकार मंडळींवर केवळ प्रेक्षकचं नव्हे तर सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीही प्रेम करताना दिसत आहेत. अनेकांनी चित्रपटाला घेऊन बरेच फोटोस, व्हिडीओ शेअर केले आहेत.
अशातच ‘झिम्मा २’चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हेमंतने ही पोस्ट चित्रपटातील त्याच्या सहकलाकारांसाठी तसेच त्यांनी साकारलेल्या पात्रांसाठी शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत हेमंतने कलाकारांनी साकारलेल्या पात्रांचे फोटो पोस्ट केले आहेत आणि त्याखाली कॅप्शन देत लिहिलं आहे की, “सगळ्या हिंसक पुरूष पात्रांच्या काळात प्रेम करणारा कबीर. अखेरच्या श्वासापर्यंत आयुष्य सुंदर करणारी इंदू, आपणंच घालून घेतलेली बंधंनं हळूहळू सैल करणारी निर्मला, नव्या रूपात नवं बाईपण जपणारी मनाली, हरवून मग स्वतःला नव्याने सापडलेली मिता, मैत्रीसाठी कोणाशीही दोन हात करणारी वैशाली, खरं बोलणारी, खरं जगणारी कृतिका, घर सांभाळणारी, आपल्या माणसांवर प्रेम करणारी तानिया, ही सगळी पात्र तुम्ही आपली केलीत, कोणाला कोणीतरी आपली ताई, आई, मावशी, आत्या, मैत्रीण वाटली, कोणालातरी वाटलं आपणंच आहोत” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – आमचं झालंय! मुग्धा-प्रथमेशची लग्नानंतरची पहिली पोस्ट चर्चेत, पारंपरिक लूक ठरतोय लक्षवेधी
पुढे त्याने असंही लिहिलं आहे की, “तुमच्यातलं व पडद्यामधलं अंतर पुसून टाकणारी ही पात्र माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंद देणारी आहेत. ही पात्र मेहनतीने, ताकदीने, कधी रूसत, कधी भांडत, कधी रडत, कधी हसत, कधी मस्ती करत पण प्रेमानं मायेनं साकारणाऱ्या माझ्या या आठ कलाकारांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी ही पोस्ट. खूप प्रेम, तुम्ही माझी पात्र जिवंत करून एकसंध केल्याबद्दल” असंही म्हटलं आहे.