‘मराठी चित्रपट न चालण्यासाठी ही कारणं आहेत….’न चालणारे मराठी चित्रपट आणि लक्ष्या ने मांडलं होत परखड मत

Reason Behind Flop Marathi Movies
Reason Behind Flop Marathi Movies

सध्या आपण पाहतोय मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट यांच्या शर्यतीत मराठी चित्रपटांना स्क्रीन्स न मिळणं ही एक मोठी समस्या बनली आहे. TDM चित्रपटाचं प्रदर्शन थांबणं, रावरंभा, फकाट, चौक, या चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलणं किंवा मराठी चित्रपट न चालणं या सर्वांना आधीपासून अनेक कलाकार, निर्माते, दिगदर्शकानी आपलं मत नोंदवलं आहे असच एकदा परखडपणे मत मांडलं होत ते अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आणि ते सध्याच्या परिस्थतीलाला तंतोतंत लागू पडताना दिसत आहे.(Reason Behind Flop Marathi Movies)

मिश्किल अंदाजात भाष्य करणारे कलाकार प्रेक्षकांना अधिक आवडतात. कधी कधी चाहत्यांच्या प्रश्नाला नजरअंदाज करणारे कलाकार पाहायला मिळतात पण काही कलाकार चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाला तेवढ्याच खुमासदार शैलीत उत्तर देतात. चाहत्याच्या अशाच एका प्रश्नाला मिश्किल उत्तर दिलं होत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी. दूरदर्शन वाहिनीवरील एका कार्यक्रमा दरम्यान एका चाहत्याने लक्ष्मीकांत यांना हिंदी चित्रपट चालतात तसे मराठी चित्रपट का चालत नाहीत असा प्रश्न विचारला यावर लक्ष्मीकांत काही उत्तर देणार नाहीत असं अपेक्षित असताना लक्ष्मीकांत म्हणाले तुम्हाला जर वाटत असेल मराठी चित्रपट चालावा तर तुम्ही स्वतः थिएटर मध्ये या आणि येऊन मराठी चित्रपट बघा. मराठी चित्रपट चालवणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.

पुढे उत्तरादाखल त्यांनी सांगितले जेव्हा साऊथ मध्ये एखादा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा तिथली जनता त्यांना प्रतिसाद देते त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत. तुम्ही जो पर्यंत थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघणार नाही तो पर्यंत मराठी चित्रपट चालणार नाही असं लक्ष्मीकांत म्हणाले.

मराठी चित्रपटांना बहारदार बनवण्यामागे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटनांचा मोठा वाटा आहे. अशी ही बनवाबनवी, एक होता विदूषक, धडाकेबाज, दे दणा दन, झपाटलेला, अशा अनेक चित्रपटांनी रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातला. आणि आजही प्रेक्षक हे चित्रपट बघताना कंटाळत नाहीत एवढं नक्की(Reason Behind Flop Marathi Movies)

हे देखील वाचा – दादांना राधानगरीच्या जंगलात सुचलं ‘वर ढगाला लागली कळं…’ वाचा नक्की काय आहे किस्सा

सध्याच्या घडीला मराठी चित्रपटांची होणारी हेंडसाळ पाहता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा त्याकाळी दिलेल्या सल्ला पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना तारणारा ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Ashok Saraf Birthday Special
Read More

त्या काळातही अशोक मामांनी सेट केला होता ‘हा’ फॅशन ट्रेंड शर्टची दोन बटणं नेहमी उघडीच का ठेवायचे अशोक मामा? मुलाखतीत सांगितलं कारण

अनेक कलाकार त्यांच्या काही विशिष्ठ अदाकारींसाठी, स्टाईल साठी ओळखले जातात. त्यांपैकी एक अभिनेता म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक…
Sonalee Kulkarni Career Begining
Read More

मराठी बोलता येत नसताना सुद्धा आज मराठी सिनेसृष्टीमध्ये मानाने घेतलं जात नाव- काय आहे सोनालीच्या पहिल्या मालिकेचा किस्सा?

मराठी सिनेसृष्टी मध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांचा मोठा चाहता वर्ग…
Nivedita Ashok Saraf
Read More

आईचा वाढदिवस आणि त्याच दिवशी निवेदितांचं पहिल्यांदा घरी येणं! अशोक सराफ यांनी सांगितलं आई गेल्यानंतरचा हा भावुक किस्सा

अनेक कलाकार आणि त्यांच्या प्रेमकहाण्या पडद्यावर दिसतात तशाच खऱ्या आयुष्यात ही असतात असं फार कमी वेळा घडत. असाच…
Laxmikant Berde First Wife
Read More

पहिल्या बायकोचे अंत्यसंस्कार आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भावुक निर्णय पाणावले होते सगळ्यांचे डोळे…

आवडत्या कलाकारांच्या लाडक्या जोड्या आणि त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेत्री अशोक सराफ आणि निवेदिता…
Avadhoot Gupte Politics
Read More

मराठी चित्रपटांची ही गोष्ट अवधूतला जास्त खूपते…

झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे खुपते तिथे गुप्ते तब्बल १० वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे.…