अशोक सराफची अशोक सराफशीच स्पर्धा झाली तेव्हा….

Ashok Saraf Opposition
Ashok Saraf Opposition

आपल्या एकावन्न वर्षांच्या अष्टपैलू कारकीर्दीत ‘बहुरुपी’ अशोक सराफने कळत नकळतपणे अनेक लहान मोठे विक्रम केलेत आणि हेच त्याचे वेगळेपण सिद्ध करते. अगदी अशोक सराफची चक्क अशोक सराफशीच जबरा स्पर्धा झाली आणि त्यात जिंकले कोण हा तुमचा प्रश्न असेलच.
त्याचा असाच एक भन्नाट विक्रम म्हणजे, १९८४ सालचे त्याची भूमिका असलेले अनंत माने दिग्दर्शित ‘कुलस्वामिनी अंबाबाई ( सहानुभूतीची झालर असलेला. घरजावई) , बिपीन वर्टी दिग्दर्शित ‘सगेसोयरे’ ( या चित्रपटात डबल रोल. बाप अट्टल दारुड्या तर मुलगा इरसाल बबन्या सोनार), सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘सव्वाशेर’ ( यात डबल रोल होता. एक हळवा, एक कडक ), राजा बारगीर दिग्दर्शित ‘ठकास महाठक’ ( राया), मुरलीधर कापडी दिग्दर्शित ‘बिनकामाचा नवरा ( महाचालू इरसाल नवरा) , सतिश रणदिवे दिग्दर्शित ‘बहुरुपी’ ( आपलं दु:ख विसरुन विविध सोंगे घेऊन लोकांना हसवणारा सावळा. (Ashok Saraf Opposition)

काहीशी चार्ली चॅप्लीनची त्यावर छाप आहे ), सुषमा शिरोमणी दिग्दर्शित गुलछडी ( माता पित्याच्या खुनाचा बदला घेणाला) , राजदत्त दिग्दर्शित ‘हेच माझे माहेर ( दोन पिढ्यांना जोडणारा कन्नडभाषिक), वसंत पेंटर दिग्दर्शित ‘जख्मी वाघिण’ ( हा नायिकाप्रधान चित्रपट. रंजनाने सूडनायिका साकारली), सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरी मिळे नवर्‍याला ( खुशालचेंंडू बाळासाहेब) आणि दत्ता गोर्ले दिग्दर्शित ‘जुगलबंदी ( खलनायक) असे चक्क अकरा चित्रपट एकाच वेळेस बाविसाव्या राज्य चित्रपट महोत्सवात दाखल झाले होते. विशेष म्हणजे त्यावर्षी एकूण चोवीस मराठी चित्रपट स्पर्धेत होते आणि एकट्या अशोक सराफचे अकरा हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे एकूण चित्रपटांच्या हे प्रमाण चाळीस टक्के होते.

बहुरूपी (Ashok Saraf Opposition)

अशोक सराफचा हा एक विक्रमच. त्या काळात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि राज्य चित्रपट पुरस्कार असे दोनच प्रामुख्याने पुरस्कार होते. त्यामुळे कमालीची चुरस होती. समजा या वर्षी पुरस्कार प्राप्त झाला नाही तर वर्षभर वाट पाहण्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हतेच आणि या पुरस्कारांना प्रतिष्ठा होता. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल अशोक सराफ म्हणजे फक्त विनोदी भूमिका असे समीकरण कधीच नव्हते.

हे देखील वाचा – ‘मराठी चित्रपट न चालण्यासाठी ही कारणं आहेत….’न चालणारे मराठी चित्रपट आणि लक्ष्या ने मांडलं होत परखड मत

….अशोक सराफने ‘बहुरुपी ‘ या चित्रपटाच्या नायकाच्या भूमिकेसाठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा शिवाजी गणेशन पारितोषिक पटकावला. तर त्याची भूमिका असलेला ‘हेच माझे माहेर ‘ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘ठकास महाठक ‘ला उत्कृष्ट चित्रपट व्दितीय क्रमांक आणि ‘बहुरुपी’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट तृतीय क्रमांक असे पुरस्कार प्राप्त झाले. विशेष म्हणजे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मधु कांबीकर यांना ‘हेच माझे माहेर’ या चित्रपटासाठी तर विशेष अभिनेत्री हा पुरस्कार सुलभा देशपांडे यांना ‘हेच माझे माहेर ‘ या चित्रपटातील अभिनयासाठी प्राप्त झाला. बाल कलाकार हा पुरस्कार ‘बहुरुपी ‘ या चित्रपटातील बेबी कल्पना हिला प्राप्त झाला.अशोक सराफची भूमिका असलेल्या अन्य चित्रपटांनाही काही पुरस्कार प्राप्त झाले.(Ashok Saraf Opposition)

अशोक सराफच्या अनेक यशस्वी गोष्टींपैकी ही एक. स्वतःशीच असलेल्या स्पर्धेची.

दिलीप ठाकूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
(Poshter Boyz 2)
Read More

मराठी पिक्चरचं “थिएटर डेकोरेशन” पाह्यला जाऊ या की….

तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, एकेकाळी पब्लिकला पिक्चर पाहण्याइतकाच भारी इंटरेस्ट सिंगल स्क्रीन थिएटर्सवरचे डेकोरेशन पाहण्यातही होता, तर आजची डिजिटल…
Madhuri Dixit Tim Cook
Read More

Apple चे सीईओ टीम कूक यांना मुंबईच्या वडापावची भुरळ, धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोबत घेतला वडापावचा आस्वाद..

तुम्ही आम्हीदेखील वडापाव खातोय, त्याचे हुकमी चवीचे ‘हाॅट स्पाॅट ‘ आपल्यालाही सवयीचे झालेत. जिभेला काही गरमागरम खावसं वाटलं…
Mahesh Kothare Sachin Pilgoankar
Read More

कोठारे-पिळगावकर कुटुंबा बाबत अनोखा योगा योग!वडिलांनी चित्रपट सृष्टीत आणलं आणि पाहिल्याचं चित्रपटात मिळवले पुरस्कार

सध्या हुकमी हवा कोणाची आहे? राजकारणातील उलटसुलट हवा म्हणत नाही हो की उन्हाळ्यात अधूनमधून चक्क वीजांचा कडकडाट होत…
Bollywood Actors in Marathi
Read More

हिंदीवाल्यांचे मराठीत पाऊल भारी कौतुकाचे

रोहित शेट्टीचा ‘स्कूल काॅलेज आणि लाईफ’ ( त्याची बायको महाराष्ट्रीय असल्याने त्याने मराठी चित्रपटाची निर्मिती करुन ‘घरची मर्जी…