मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागेला “देवयानी” या मालिकेत सम्राट या नेगीटिव्ह भूमिकेत आपण पहिले होते. परंतु “जय मल्हार” या मालिकेतून घराघरात पोहोचून देवदत्त नागेनी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ घातली. या मालिकेत देवदत्त अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या “खंडोबा” देवाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या सोबत या मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेत्री सुरभी हांडे देखील होत्या. देवदत्त जिथे कुठे जाईल तिथे याला जुनी माणसे “खंडोबाचं” समजत असतं आता देवदत्त आपल्याला हिंदी सिनेमात हनुमानाची भूमिका करताना दिसणार आहे. (Adipurush new update)
हे देखील वाचा : ‘शूटिंग काळात तरुणाचा मृत्यू’ महेश मांजरेकरांचा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!
“आदिपुरुष” या नावाचा हिंदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर आदिपुरुष या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता देवदत्त नागेनी चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. या पोस्टर मध्ये देवदत्त सोबत चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसतोय तर बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन ही सीतेच्या भूमिकेत दिसते आहे. या पोस्टला
त्यांनी या पोस्टला “मंत्रों से बढ़के तेरा नाम जय श्री राम” असे कॅप्शन दिले आहे. तर या पोस्टवर देवदत्तच्या अनेक चाहत्यांनी व मराठी कलाकारांनी “जय श्री राम” म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.(Adipurush new update)
अभिनेता देवदत्त नागे काही दिवसांपासून आदिपुरुष या चित्रपटामुळे चर्चेत आला असून, त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे देवदत्त कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेमध्ये काम करताना दिसला होता. जीव माझा गुंतला या मालिकेच्या शूटवेळी त्याला दुखापत झाल्यामुळे त्यांनी चित्रीकरणामधून ब्रेक घेतला होता. देवदत्त हा सोशलमिडीयावर देखील सतत सक्रिय असून तो आदिपुरुष या चित्रपटाचे काही पोस्टर नेहमी सोशल मीडियावर शेअर करत होता. परंतु आज पोस्ट केलेल्या त्याच्या पोस्टर मधील लूकमुळे प्रेक्षक आता आदिपुरुष या चित्रपटात देवदत्त नागेला हनुमानाच्या भूमिकेत बघायला उत्सुक आहेत.
