शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सांडपाणी, गटाराच्या पाण्यात उभं राहून शूट अन्…; CIDच्या शूटबाबत दयाचा मोठा खुलासा, म्हणाला, “कधीच तक्रार न करता…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 4, 2024 | 3:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Dayanand Shetty talks about shooting CID while standing in sewage, sewer water

अभिनेता दयानंद शेट्टीने सीआयडी शोच्या शूटिंगबाबत काही खुलासे केले आहेत

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सीआयडी (CID) ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. या मालिकेने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. १९९८ ते २०१८ पर्यंत म्हणजेच तब्बल २० वर्ष ही मालिका चालली. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, फ्रेडी यांच्याबरोबरच इतर सर्वच पात्र गाजली. प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या केस सोडवताना प्रेक्षकही टीव्हीसमोर बसून असायचे. ‘कुछ तो गडबड है दया’, ‘दया तोड दो दरवाजा’ हे डायलॉगही प्रचंड गाजले. आता पुन्हा एकदा ही टीम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. इतकच नव्हे तर मराठीत ही टीम सत्याचा शोध घेण्यासाठी येणार आहे. शोचा पहिला सीझन तब्बल २० वर्षे चालला. त्यानंतर आता अभिनेता दयानंद शेट्टीने शोच्या शूटिंगबाबत काही खुलासे केले आहेत. (Dayanand Shetty on CID Shooting)

सीआयडीच्या आठवणी सांगताना दयानंद शेट्टी म्हणाले की, “तिथले सगळे एकमेकांशी आदराने वागतात. कोणत्याही लहान-मोठ्या अभिनेत्याला वेगळी वागणूक मिळाली नाही. प्रत्येकाला स्वतंत्र व्हॅनिटी व्हॅन मिळाली असली तरी कलाकार एकच मेकअप रूमचा वापर करायचे.  तिथे कोणताही भेदभाव नव्हता. कोणी शो सोडण्याचा विचार करत असला तरी त्याला वेगळी वागणूक मिळाली नाही. आपण सर्व मानव आहोत आणि प्रत्येकाशी आदराने वागतो. हे सैन्यासारखे होते, जिथे प्रत्येकजण आपले काम करत असे आणि कोणीही कोणालाही लहान किंवा मोठे मानत नाही”.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

आणखी वाचा – मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचं निधन, चार महिन्यांमध्येच मोडला होता संसार, नक्की काय झालेलं?

पुढे शोच्या शूटिंगबाबत अभिनेता म्हणाला की, “कथेच्या आवश्यकतेनुसार आम्हाला सांडपाणी आणि घाण पाण्यात शिरावे लागले होते. आम्ही दिग्दर्शकाला कधीच सांगितले नाही की आम्ही त्यात उडी मारू शकत नाही. कारण तो गलिच्छ आहे. आपण नकार देऊ शकत नाही. या शोचे लष्करी स्तरावर शूटिंग करण्यात आले. सीआयडीचा मुख्य आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक दिवस वेगळा होता. शूटिंग ठिकाणे आणि आणि सहकलाकार नेहमी बदलत राहिले. कधी मोठ्या कलाकारांबरोबर तर कधी इतर कलाकारांबरोबर शूट करावं लागलं”.

आणखी वाचा – Video : भाचीबरोबर विशाखा सुभेदारांचा बेभान होऊन डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण, कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, ९० च्या दशकातील ही गाजलेली मालिका आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर मराठी सीआयडी (CID) मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून ही मालिका कधी सुरु होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. येत्या ८ नोव्हेंबर पासून शुक्रवार ते रविवार् रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: cid fame Dayanand ShettyDayanand ShettyDayanand Shetty on CID Shooting
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
drashti dhami baby look

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, आईपण करत आहे एन्जॉय, फोटो पाहून कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.