शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अविनाश नारकरांचं सासऱ्यांवर आहे जीवापाड प्रेम, शेअर केला व्हिडीओ, म्हणाले, “ज्यांनी माझं आयुष्य…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 31, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Avinash Narkar shared a special post for his father-in-law and posting picture with him

सासऱ्यांसाठी अविनाश नारकरांची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाले, "त्यांचे उपकार साता जन्मात फेडू शकणार नाही"

मराठमोळे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे कायमच चर्चेत असणारे कपल आहे. या कपलने ९०च्या दशकातील चित्रपट गाजवले होते. आजही एक आदर्श म्हणून ओळखले जातात. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे एकत्र डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ऐश्वर्या व अविनाश यांना डान्सची आवड आहे. त्यामुळे हे दोघेही त्यांची डान्सची आवड पूर्ण करताना दिसून येतात. अविनाश नारकर हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात. ते त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात आणि त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. (Avinash Narkar Father in Law)

अशातच त्यांनी नुकतीच केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अविनाश यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सासऱ्यांबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे त्यांचे कौतुक केलं जात आहे. अविनाश यांनी सासऱ्यांबरोबरचा फोटो शेअर करत या फोटोला त्यांनी ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ हे गाणं लावलं आहे. या फोटोमध्ये अविनाश व त्यांचे सासरे हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत अविनाश यांनी सासऱ्यांसाठी खास पोस्टही लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Avinash Narkar (@avinash.narkar)

आणखी वाचा – “लक्ष्याच विंगेत उभं राहून लेकाला…”, वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, म्हणाला, “माझं पहिलं नाटक त्यांनी बघितलं असतं तर…”

या पोस्टमध्ये अविनाश यांनी असं लिहिलं आहे की, “ज्यांनी माझं अख्खं आयुष्य, माझं संपूर्ण जगणं सर्वार्थाने ऐश्वर्य संपन्न केलं त्या या माझ्या सासरेबुवांचे… निर्मळ मनाच्या बाबांचे उपकार खरंच साता जन्मात फेडू शकणार नाही मी…” अभिनेत्याच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच त्यांच्या या पोस्टचे कौतुकही केलं आहे. याशिवाय ऐश्वर्या नारकरांनीसुद्धा ही पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

आणखी वाचा – व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन बघतात अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक खुलासे, नक्की चाललंय काय?

दरम्यान, अविनाश नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी त्यांची ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं होतं. त्यानंतर अविनाश काही दिवसांपूर्वीच आलेल्या ‘डंका हरी नामाचा’ या चित्रपटात झळकले. अशातच ते आता कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.   

Tags: avinash narkaravinash narkar father in lawmarathi actor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
01 September 2024 Sunday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

01 September Horoscope : कन्या व तूळ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस स्वप्नपूर्तीचा, बाकीच्या लोकांच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.