Actor Atul Parchure Passes Away : चतुरस्त्र मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं यकृताच्या कर्करोगाशी झुंजताना निधन झालं आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा परसरली आहे. मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. तीन वर्षांपूर्वी अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता, कर्करोगावर मात करून ते बाहेर आले होते. असंख्य गाजलेल्या मालिका, विविध नाटके आणि चित्रपटांमधून घराघरांत लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड झाले आहेत. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अतुल परचुरे यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी दुःख व्यक्त केले. आज (मंगळवार १५ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आता अतुल परचुरे यांना अखेरचं पाहण्यासाठी मराठी कलाविश्वात मंडळींनी गर्दी केली असल्याचं दिसत आहे. यावेळी अभिनेत्री निवेदिता सराफ या देखील अतुल यांना शेवटचं पाहण्यासाठी उपस्थित होत्या.
अतुल यांना शेवटचा निरोप देताना निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर झाले. अतुल यांना नमस्कार करताना त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. निवेदिता यांच्याबरोबरच वंदना गुप्ते, सविता मालपेकर या कलाकारांनाही अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. “माझा एक खूप चांगला मित्र गेला. आमच्या दोघांच्या करिअरची सुरवात एकत्र झाली होती. टिळक आणि आगरकर या नाटकातून. अतुलसारख्या एका उत्कृष्ट आणि हरहुन्नरी कलाकाराला माझा सलाम”, असं कॅप्शन देत निवेदिता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन भावुक पोस्टही शेअर केलेली पाहायला मिळाली.
आणखी वाचा – Atul Parchure Death : मोठा धक्का! सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा
अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. या जीवघेण्या आजारावर त्यांनी यशस्वीपणे मात केली होती मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली.