तुमचे आमचे सर्वांचे लाडके म्हणजे अशोक मामा. विनोदाची वेगळी दृष्टी, विनोदाचं भन्नाट टायमिंग या कारणांसाठी प्रामुख्याने अशोक मामा ओळखले जातात. कधी, कुठे, कोणत्या प्रसंगी मामांना सुचलेला हलका विनोद उपस्स्थितांच्या चेहऱ्यावर हसू उमटवून जाईल काही सांगता येत नाही.(Ashok Saraf Funny Moment)
मामांच्या अशाच मिश्किल अंदाजाने नुकतंच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचं व्हॅक्युम क्लिनर हे नाटक सध्या रंगभूमीवर तुफान चालू आहे. त्या निम्मित एक छोटेखानी सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं होत. त्यावेळी फोटो काढण्याच्या प्रसंगी अशोक सराफ यांचा खट्याळ अभिनय पाहून सगळेच हसू लागले. झालं असं कि मामा म्हणाले माझा फोटो काढणार आहे का कोणी तेव्हा समोरून हो असं उत्तर आल्यावर मामानी दिलेल्या फेस एक्सप्रेशन पाहून एकच हशा पिकला.आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झालं मी अशोक सराफ यांच्या सारखं विनोदाचं टायमिंग जुळणं शक्य नाही.
यावेळी अभिनेत्रीं निर्मिती सावंत, निवेदिता सराफ सोबतच महाराष्ट्राची आणखी एक लाडकी जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगाकार देखील उपस्थति होते.(Ashok Saraf Funny Moment)