बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनेता अर्जुन बिजलानीच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, शस्त्रक्रियेनंतर अभिनेता घरी आला अन्…; फोटो समोर  

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 12, 2024 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Arjun bijlani Instagram post

अभिनेता अर्जुन बिजलानीच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, शस्त्रक्रियेनंतर अभिनेता घरी आला अन्...; फोटो समोर

लहान पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता व सूत्रसंचालक अर्जुन बिजलानी हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या तो ‘प्यार का पहला अध्याय: शिव शक्ति’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   पण काही दिवसांपूर्वी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता. त्याने उपचार घेण्यासाठी रुग्णालयात भरती झाल्याची स्टोरी इन्स्टाग्रामवरुन शेअर केली होती. यावर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. आता त्याच्याबद्दलचे मोठे वृत्त समोर येत आहे. (Arjun bijlani Instagram post)

अर्जुन ८ तारखेला पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता. पण आता खुद्द अर्जुननेच त्याबद्दल खुलासा केला आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. त्यानंतर आपले काही फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना तब्येतीची माहिती दिली आहे. तो सध्या घरी आराम करत असून त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत आणि त्यावर लिहिले आहे की, “मी आता घरी आहे. मी माझ्या रिकव्हरी कॉर्नरमध्ये आहे”.

आणखी वाचा – एक रुपयाही मानधन घेतेले नाही पण दहापटीने कमावले; ‘आनंद’ चित्रपटातील राजेश खन्ना यांचा काय आहे नेमका किस्सा?, ५१ वर्षांनी आला समोर

View this post on Instagram

A post shared by Arjun Bijlani ???? (@arjunbijlani)

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, “तुला घरी पाहून आनंद झाला. आराम करा, नेहाला त्रास देऊ नका, तुमचा वेळ एंजॉय करा”, दुसरा चाहता लिहितो की, “तुम्हाला घरी असलेले पाहून खूप बरं वाटलं, आशा आहे की तुम्ही लवकरात लवकर ठीक व्हाल”. तसेच इतर नेटकरीही अर्जुनला घरी आराम करताना पाहून खूप खुश आहेत आणि तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थनाही करत आहेत.  

आणखी वाचा -“सलमान इतके यशस्वी झालो नाही…” बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अरबाज खान स्पष्टच बोलला म्हणाला, “आई वडिलांच्या ओळखीने…”

काही दिवसांपूर्वीच अर्जुनने शस्त्रक्रिया झाल्यानंतर एक पोस्ट केली होती त्यामध्ये त्याने लिहिले होते की, “माझी शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली आहे आणि मी आता रिकव्हर होत आहे. मला आज कालपेक्षा बरं वाटत आहे. मी आज माझ्या पायांवर उभा आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्यासाठी धन्यवाद. मी माझ्या आयुष्यात असणाऱ्या आणि मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. तसेच डॉक्टर व कुटुंबाचेही आभार मानतो”.   

अर्जुन लवकरच पूर्ण बरा होऊन आपले काम सुरू करेल असे सांगितले जात आहे.

Tags: Actor Arjun bijlanihindi tv actorhostreality showtelevision actortv serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Ankita Lokhande Statement

"त्याच्या डोक्यावर बसून नाचलात तरी…", नवऱ्याला घटस्फोट देण्याच्या चर्चांवरुन अंकिता लोखंडे स्पष्टच बोलली, म्हणाली, "तो दुसरीकडे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.