बॉलिवूडमधील पटकथा लेखक व निर्माते सलीम खान यांचा मोठा मुलगा आणि अभिनेता सलमान खानचा लहान भाऊ अरबाज खानने दुसरं लग्न केल्याने चर्चेत आला होता. त्याने ‘दरार’ या चित्रपटातून १९९६मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनंतर त्याने सलमान खानबरोबर ‘हेलो ब्रदर’, ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटांमध्येही दिसून आला. अनेक चित्रपटांचा तो निर्माताही होता. पण सध्या तो अभिनय क्षेत्रापासून लांब असलेला दिसत आहे. अशातच त्याने आता बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य केले आहे. (Arbaaz khan on nepotism)
अरबाज हा बॉलिवूडमधील मोठ्या घराण्यातील मुलगा आहे. एका मुलाखतीदरम्याने त्याच्याशी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर चर्चा केली गेली. त्याला विचारले की, “स्टार किड्सना घराणेशाहीचा फायदा होतो का?”, त्यावर अरबाजने उत्तर दिले की, “जर तुमचे वडील एखाद्या क्षेत्रात असतील तर त्या क्षेत्राचे दरवाजे तुमच्यासाठी खुले होतील मात्र तिथे काम ही तुम्हाला तुमच्या टॅलेंटवर मिळणार आहे. तुमच्या आई-वडिलांच्या ओळखीने नाही. तसेच हे केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर सर्वच क्षेत्रात असंच आहे”.
पुढे तो म्हणतो की, “मी हे मान्य करेन की जर तुमच्या घरातील एखादा सदस्य त्या क्षेत्रात असेल तर काम शोधणे सोपं असतं. पण तुम्ही तिथे काम करु शकला नाहीत तर तुम्हाला यश मिळणार नाही. लोकांना जर तुमचे काम आवडले नाही तर तुम्हाला कोणीही काम देणार नाही”. तसेच त्याने स्पष्ट केले की, “या क्षेत्रामध्ये सोहेल व मी अभिनेता म्हणून सलमान इतके यशस्वी झालो नाही.तरीही आम्ही या क्षेत्रात आहोत. आम्ही आमच्यापरीने काम करत आहोत. ही सर्व व्यावसायिक असल्याने कोणीही कोणाची मदत करत नाही आहे. जे सुरू आहे ते असं सुरू आहे.
आणखी वाचा – “याचा फोन फोडू का मी…”, फोटोग्राफरवर का भडकली सई ताम्हणकर?, व्हिडीओ होतोय व्हायरल
काही वर्षांपूर्वी अरबाज नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर ‘फ्रिकी अली’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून दिसला होता. अरबाज सध्या आपल्या प्रोडक्शन हाऊस निर्मित ‘पटना शुक्ला’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये रविना टंडन वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच ‘दबंग ४’ चित्रपटाची निर्मितीही करणार आहे. यामध्ये तो सलमान खानबरोबर दिसणार आहे.