५३ वर्षांपूर्वी हृषीकेश मुखर्जी यांचा ‘आनंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अमिताभ बच्चन व राजेश खन्ना यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. चित्रपट निर्माता राज कपूर यांच्याबरोबरच्या दिग्दर्शकाच्या नात्यावर आधारित हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. अभिनेता रमेश देव यांनी एकदा या चित्रपटाबाबतचा एक प्रसंग सांगितला होता. यासाठी राजेश खन्ना यांनी एक रुपयाही मानधन घेतलं नसल्याचं सांगण्यात आलं. (Rajesh Khanna Incident)
रमेश देव यांनी सांगितलेला हा किस्सा चित्रपट इतिहासकार दिलीप ठाकूर यांनी ‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. ‘रमेशने एकदा मला सांगितले की, राज कपूर आजारी असताना हृषिकेश मुखर्जी यांना आनंदच्या कथेची कल्पना आली. या सिनेमात किशोर कुमारला मुख्य भूमिका करायची होती. दिग्दर्शक ऋषी यांनी मद्रास ते मुंबईच्या फ्लाइटमध्ये धर्मेंद्रला त्याची कथा सांगितली होती. पण नंतर राजेश खन्नाबरोबर शूटिंग सुरु केले.
दिलीप ठाकूर यांनी ‘आनंद’साठी राजेश खन्ना यांना कास्ट करण्यामागील कथा सांगितली. ते म्हणाले, “जेव्हा राजेशला कळले की ऋषी दाची खूप चांगली कथा आहे. म्हणून तो त्याच्या जवळ गेला. तेव्हा ऋषीने त्याला मोठ्या प्रमाणात तारखा देण्यास सांगितले कारण त्यावेळी अभिनेता खूप व्यस्त होता. आनंदचे शूटिंग २८ दिवसांत पूर्ण झाले. रमेशने मला सांगितले होते की, आनंदच्या शूटिंगसाठी राजेश दररोज दोन तास येणार होता”.
दिलीप ठाकूर पुढे म्हणाले, ‘एक दिवस राजेश खन्ना आले नाहीत तेव्हा ऋषी दा रागावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजेश खन्ना आले तेव्हा ऋषीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि कॅमेराबरोबर काहीतरी करायला सुरुवात केली. पण असे असूनही हा चित्रपट पूर्ण झाला. एवढेच नाही तर, अभिनेत्याने ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ हे गाणं चित्रपटासाठी स्वतःवर चित्रित करायला सांगितले, जे क्रेडिट गाणे होते. यासाठी त्याने कोणतेही मानधन घेतले नाही. पण त्याला त्याच्या शक्तीराज फिल्म्सच्या अंतर्गत आनंद चित्रपटाचे वितरण हक्क मिळाले होते. ज्याद्वारे राजेश खन्ना यांनी १० पट अधिक कमाई केली होती”.