ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला. तसेच देव कुटुंबीय त्यांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडून गेलं. सीमा देव यांना अखेरचा निरोप देताना त्यांची मुलं अभिनय देव व अभिनेता अजिंक्य देव यांना अश्रू अनावर झाले होते. दोघंही आईच्या पार्थिवा शेजारी बसून त्याकडे एकटक बघत होते. तर अजिंक्यची अवस्था पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्यने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
गेली काही वर्ष सीमा या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. या आजारामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तीला कालांतराने काहीही आठवत नाही. स्मृतीभ्रंश म्हणजे अल्झायमर. सीमा यांनाही स्मृतीभ्रंशचा सामना करावा लागला. २०२०मध्ये अजिंक्यने ट्वीट करत त्याच्या आईच्या आजाराबाबत सांगितलं होतं. आईच्या निधनानंतर अजिंक्यने शेअर केलेला व्हिडीओ डोळ्यात पाणी आणणारा आहे.
अजिंक्यने त्याच्या घरामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका जागी उभा राहिलेला दिसत आहे. तसेच त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने याला एक भावुक कॅप्शन दिलं आहे. अजिंक्यने म्हटलं की, “ती होती आणि आता ती नाही”. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा – “बाबा बेबीसीटिंगला असतो तेव्हा…”, लेकाला असं सांभाळतो प्रसाद खांडेकर, म्हणाला, “नाश्तासुद्धा…”
तू खचून जाऊ नको आम्ही तुझ्याबरोबर आहोत, आईशिवाय जीवन व्यर्थ आहे, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आई गेल्यानंतर देव कुटुंबियांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना अजिंक्यने व्यक्त केली होती. आता त्याला घरामध्येही एकटं वाटत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.