छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचा लाडका बनला आहे. कलाकारांची विनोदी अभिनयामुळे या कार्यक्रमाचे प्रेक्षक दिवाने झाले आहेत. त्यामागे खरी साथ मिळते, ती पडद्यामागील तंत्रज्ञ, लेखक-दिग्दर्शक व संपूर्ण टीमची. त्याचसोबत कलाकारांच्या स्किट्समध्ये असलेलं नावीन्यपणा व विविध घडामोडींवर विनोदी सादरीकरण यांमुळे हा कार्यक्रम अनेकदा टीव्ही व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहिला जातो. आता काही दिवसांपूर्वी हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर परतला असून अनेक सीझनप्रमाणे याही सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. (Maharashtrachi Hasyajatra)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना जेवढं हसवत आहे. तेवढाच ते सामाजिक भान जपतानाही दिसत आहे. अशीच एक कृती या कार्यक्रमातील कलाकारांनी केली आहे, ज्याचे कौतुक होत आहे. हास्यजत्रेच्या कलाकारांनी काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्यासाठी एक खास कार्यक्रम केला होता. हास्यजत्रेचे कलाकार समीर चौघुले, श्याम राजपूत, वनिता खरात, ओंकार राऊत, रोहित माने, चेतना भट, प्रथमेश शिवलकर व श्रमेश बेटकर या कलाकारांसह लेखक-दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे उपस्थित होते. कार्यक्रमातील कलाकारांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन करणारी स्किट्स सादर केली.
हे देखील वाचा – “आम्हा दोघींना वेगळं करणारं…”, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची पहिली पोस्ट, म्हणाली, “त्यांच्या मांडीजवळ बसून…”
संस्थेचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी हास्यजत्रेतील कलाकारांचे आभार मानले आहेत. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सचिन मोटे व कार्यक्रमातील कलाकारांचे आभार मानले आहे. हमीद दाभोलकर यात म्हणाले, “सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि समीर चौघुले हे महाराष्ट्राचे आवडते लेखक दिग्दर्शक आणि कलाकार अनिसच्या ‘हास्य जागर’ कार्यक्रमाला आले आणि त्यांच्या टीमसोबत खळखळून हसवणारी तरीही विचार करायला भाग पाडणारी स्किट सादर केली. कला क्षेत्रात ते मोठे आहेतच, पण त्यांचे माणूस म्हणून मोठेपण यानिमित्ताने अनुभवता आले.”
हे देखील वाचा – “बाबा बेबीसीटिंगला असतो तेव्हा…”, लेकाला असं सांभाळतो प्रसाद खांडेकर, म्हणाला, “नाश्तासुद्धा…”
“अशी माणसं सामाजिक कामाच्या सोबत उभी राहतात तेव्हा अनिस सारख्या प्रवाहाच्या विरोधात पाहण्याचे काम करणाऱ्या चळवळींना ते खूप आधराचे असते. कार्यकर्त्यांचा काम करण्याचा उत्साह त्याने दुप्पटीने वाढतो. कृतज्ञता दोन्ही सचिन सर, समीर दादा आणि सगळी टीम.” असे म्हणत हमीद दाभोलकर यांनी हास्यजत्रेचे आभार मानले आहे. (Maharashtrachi Hasyajatra)