बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाबा बेबीसीटिंगला असतो तेव्हा…”, लेकाला असं सांभाळतो प्रसाद खांडेकर, म्हणाला, “नाश्तासुद्धा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 26, 2023 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Khandekar and Shlok Khandekar

"बाबा बेबीसीटिंगला असतो तेव्हा…", लेकाला असं सांभाळतो प्रसाद खांडेकर, म्हणाला, "नाश्तासुद्धा…"

बरेच असे कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून कुटुंबियांना, जिवलग व्यक्तींना वेळ देता येत नाही. पण तरीही ते त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून ते कुटुंबियांनासह वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यानंतरचे बरेच खास क्षण अनेक कलाकार चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करतात. तर अनेक कलाकार आपल्या मुलांसोबतचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. बरेच असे कलाकार आहेत जे कामाबरोबरच आई वडील म्हणून आपल्या पाल्याची उत्तम जबाबदारी पेलवतात. (Prasad Khandekar and Shlok Khandekar)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद खऱ्या आयुष्यात पती व वडिलांची जबाबदारी अगदी उत्तमरित्या सांभाळतो. त्याच्या कुटुंबाचे, तसेच त्याचा मुलगा श्लोक सोबतचे अनेक फोटो तो नेहमीच सोशल मीडियावरून शेअर करत असतो. प्रसाद त्याच्या कामामधून मिळालेल्या वेळेमध्ये तो कुटुंबाला अधिकाधिक वेळ देताना दिसतो.

आणखी वाचा – ‘सुभेदार’ पाहिल्यानंतर अजय पुरकरांची लेक थिएटरमध्येच त्यांना मिठी मारुन रडली, भावुक व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर प्रसादच वावर हा अधिक असलेला पाहायला मिळतो. प्रसाद सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रसादच इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं होत. त्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा त्याने नवीन अकाऊंट सुरु केलं आहे. याआधी त्याने श्लोकचे अनेक गंमतीशीर व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी नेहमीच पसंती दर्शवलेली पाहायला मिळते.
त्यानंतर आता प्रसादने शेअर केलेल्या लेकाच्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

प्रसाद एक उत्तम अभिनेता आहेच हे साऱ्यांना माहितच आहे मात्र तो एक उत्तम वडील देखील आहे. हे त्याच्या पोस्टवरून नेहमीच कळत. त्याच्या व त्याच्या लेकाचं उत्तम बॉण्डिंग आहे. अशातच प्रसादने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक श्लोकचा फोटो पोस्ट केला आहे. यांत त्याने श्लोकचा फोटो पोस्ट केला असून, त्याखाली त्याने कॅप्शन देत म्हंटल आहे की, “जेव्हा बाबा बेबी सिटिंगला असतो आणि नाश्ता सुद्धा त्यालाच बनवायचा असतो, तेव्हा श्लोकची मज्जा असते आणि बाबाची पण.”

आणखी वाचा – “त्या आजारी होत्या हे माहीत होतं पण…”, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर निवेदिता सराफ यांची पोस्ट, म्हणाल्या, “त्यांना पाहून मी…”

श्लोकचा सांभाळ करायला प्रसाद घरी राहिलेला असून त्यावेळी बाप लेकाची सुरु असलेली मज्जा त्याने सोशल मीडियावरून शेअर केली आहे. यांत त्याने नाश्ता म्हणून श्लोकला बाहेरून बर्गर आणून दिला आहे. जो पाहून श्लोकला आनंद झाला आहे. बापलेकाची ही धमाल पाहून चाहत्यांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे.

Tags: entertainmentmaharashtrachi hasyajatramhjprasad khandekarshlok khandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
actor ajay purkar talk about marathi people

“मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे कारण...”, ‘सुभेदार’ फेम अजय पुरकरांचं मोठं विधान, म्हणाले, “कुठलीही व्यक्ती...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.