अनेकदा पडद्यावर घडणाऱ्या घडामोडींपेक्षा पडद्यामागे घडणाऱ्या काही रंज गोष्टी जाणून घेण्यात प्रेक्षकांना व चाहत्यांना अधिक रस असतो. शूटिंग नेमकं कसं चालतं? मालिकेचे सेट्स नेमके कसे असतात आणि या सेटवरील एकूण वातावरण कसं असतं हे जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो आणि मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांपर्यंत पडद्यामागच्या रंजक घटना, प्रसंगे किंवा काही किस्से शेअर करत असतात. अशा काही कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे. तितीक्षा तावडे ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. (Titeekshaa Tawde Shared Serial Set Video)
अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे अबेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियाबरोबरच तितीक्षाचे स्वत:चे एक युट्यूब चॅनेलदेखील आहे. तितीक्षा तावडे ही युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील काही खास क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सेटवरील मजामस्ती, आयुष्यातील काही खास क्षण, तसंच वैयक्तिक व कामावरील काही लेटेस्ट अपडेट्स तितीक्षा तिच्या या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या प्रेक्षकांना ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या सेटची सफर घडवून आणली आहे.
आणखी वाचा – “मालिका करायचीच नव्हती पण…”, नवी मालिका सुरु होताच अशोक सराफ यांचं वक्तव्य, म्हणाले, “ते धोबीकाम होत जातं…”
तितीक्षाने तिच्या युट्यूब व्हिडीओद्वारे मालिकेचा सेट, शूटिंगबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली आहे. यामध्ये तितीक्षाने राजाध्यक्षांचे घर, घराचा हॉल, किचन, बेडरुम्स तसंच इतर ठिकाणी चालणाऱ्या शूटिंगची खास झलक या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. सेटवर सीन्सनुसार बदलणारे लोकेशन्सबद्दलही तिने या व्हिडीओमध्ये माहिती दिली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा हा सेट अगदी भव्य असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. तसंच या सेटवर कलाकार व तंत्रज्ञ मंडळींच्या मेहनतीचीही खास झलक पाहायला मिळत आहे.
दरम्यान, तितीक्षाचा सोशल मीडियावर बऱ्यापैकी चाहतावर्ग आहे. अशातच आता युट्यूबवरही तिने आपला चाहतावर्ग कमावला आहे. तितीक्षाच्या युट्यूब चॅनेलला सिल्व्हर बटण मिळालं असून याबाबत नुकतीच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या फोटोसह तिने “मी २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात माझं युट्यूब चॅनेल सुरु केलं होतं. त्यानंतर २०२४ च्या मार्च महिन्यात मला सिल्व्हर बटण मिळालं. याबद्दल मला सगळ्यांना धन्यवाद म्हणायचं आहे” असं म्हटलं होतं.