रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुकानावर गुजराती भाषेमध्ये नावाची पाटी पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “महाराष्ट्रात व्यवसायांच्या पाट्या…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 23, 2023 | 10:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aastad Kale Instagram Post

दुकानावर गुजराती भाषेमध्ये नावाची पाटी पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, "महाराष्ट्रात व्यवसायांच्या पाट्या..."

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळेने आपल्या अभिनयाद्वारे चित्रपट, नाटक आणि छोटा पडदा गाजवला आहे. याबरोबरच तो ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. त्यात त्याच्या खेळीचे चाहत्यांनी कौतुक केले होते. काही दिवसांपूर्वी आस्ताद ‘सुभेदार’ या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यात त्याने साकारलेल्या पात्राचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. (Aastad Kale Instagram Post)

आस्ताद अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. या माध्यमातून तो त्याच्या चित्रपटांची माहिती सतत देत असतो. शिवाय त्याच्या खासगी आयुष्यातील क्षण शेअर करण्याबरोबरच विविध मुद्द्यांवरही अनेकदा व्यक्त झालेला आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटोज पोस्ट केले आहेत. या पोस्टद्वारे त्याने दुकानांमध्ये मराठी पाटी नसल्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

हे देखील वाचा – “काही शोमध्ये कलाकारांची खेचली जाते आणि…”, अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “डोक्यात जातात कारण…”

आस्तादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटोज शेअर करत एक पोस्ट केली आहे. शेअर केलेला हा फोटो मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या ससुनवघर गावाजवळच्या एका दुकानाचा आहे. त्या दुकानाच्या नावाची पाटी गुजराती भाषेत असल्याचे तो यात म्हणतो. त्यावर संताप व्यक्त करत आस्ताद म्हणाला, “महाराष्ट्रात व्यवसायांच्या पाट्या मुख्यतः मराठीत (त्यांना देवनागरीत म्हणायचंय खरंतर) असाव्यात असे प्रयत्न करणा-यांना मुंबईच्या जरा बाहेरचं हे दिसलं नसेल का?”

View this post on Instagram

A post shared by Aastad Sunita Pramod Kale (@aastadkale)

हे देखील वाचा – “लोक अनेकदा…”, ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये वयाने मोठे दिसणाऱ्यावरुन अपूर्वा नेमळेकर व तेजश्री प्रधान ट्रोल, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आमचं वय…”

त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी सहमती दर्शवत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने प्रतिकिया देताना मराठी फक्त राजकारणापुरती केली जात असल्याचे म्हटलं आहे. अभिनेता आस्ताद काळे आपल्या चित्रपटांसह अनेक मालिका व नाटकांमध्ये दिसलेला आहे. काही दिवसांपूर्वी तो ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत झळकला आहे. शिवाय, तो नुकताच बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता.

Tags: aastad kaleAastad Kale Instagram Postinstagram postmarathi actor
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Raghav Parineeti marriage in Udaipur functions start

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding राघव चड्ढाची लग्नमंडपात होणार ग्रँड एण्ट्री, लाखो रुपयांचा खर्च, लग्नापूर्वीच्या विधींसाठी नटली परिणीती चोप्रा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.