शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आज बाबा असते तर…”, अभिनय बेर्डेने व्यक्त केली खंत, आठवणीत भावुक होत म्हणाला, “माझ्यात तो गुण…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 19, 2024 | 8:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhinay Berde is emotional in memory of his father Laxmikant Berde and also wishes that he was here today.

“आज बाबा असते तर...”, अभिनय बेर्डेने व्यक्त केली खंत, आठवणीत भावुक होत म्हणाला, “माझ्यात तो गुण...”

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील एक अजरामर नाव आहे. त्यांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त मराठी नाही तर हिंदी सिनेसृष्टीलाही आपल्या अभिनयाने वेड लावले. लक्ष्मीकांत यांनी चंदेरी दुनियेसह रंगभूमीचे मंचदेखील गाजवले. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा लेक अभिनय बेर्डेदेखील मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवत आहे. अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वीच मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा ‘ती सध्या काय करते?’ हा चित्रपट बराच गाजला.

‘ती सध्या काय करते?’नंतर ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज ४’ या चित्रपटांतून अभिनयने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. चित्रपटांतून मनोरंजन केल्यानंतर अभिनय आता रंगभूमीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. सध्या तो ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकतीच त्याने आरपार या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यात त्याने त्याचे बाबा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे आज असते तर मी कदाचित वेगळा व्यक्ती असतो असं म्हटलं.

View this post on Instagram

A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

आणखी वाचा – Video : बायकोचा दरारा! रितेश देशमुखने जिनिलियासमोर सुधारली ‘ती’ चूक, दादा-वहिनींचा व्हिडीओ चर्चेत  

याबद्दल अभिनय असं म्हणाला की, “माहिती नाही. पण बाबा असते तर कदाचित मी व्यक्तीच वेगळा असतो. पूर्णपणे नाही पण कदाचित वेगळा व्यक्ती असतो. पण बाबा आता आले तर त्यानी माझं नाटक बघावं असं मला वाटेल. त्यांनी माझं नाटक बघितलं तर मला खूप आवडेल. माझ्या नाटकाची अनाउन्समेन्ट (उद्घोषणा) त्यांच्याच आवाजात आहे. तर त्यांनी माझं नाटक बघितलं तर मला खूपच मजा येईल”.

आणखी वाचा – नेत्राच्या पोटात वाढतोय विरोचकाचा अंश, विरोचकाच्या नवीन शक्तीने राजाध्यक्ष हैराण, काय असेल देवीआईच्या लेकींचं पुढचं पाऊल  

यापुढे तो असं म्हणाला की, “ते आज असते तर त्यांच्याबरोबर त्यांचचं ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ हे नाटक करायला मज्जा आली असती. त्यामुळे ते आज असते तर खूप वेगळाच अनुभव आला असता. ते स्वत: खूप हजारजबाबी होते. त्यामुळे माझ्यात तो गुण त्यांच्याकडून आला आहे. विनोदही त्यांच्याकडूनच आला आहे आणि  क्षितिज पटवर्धन म्हणतात त्याप्रमाणे टायमिंगही त्यांच्याकडून आला आहे”.       

Tags: abhinay berdelaxmikant berdemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
"तेव्हा कुणीही पाठीशी उभं राहिलं नाही", 'वेड' चित्रपटाबद्दल रितेश देशमुखचा मोठा खुलासा, म्हणाला, "शूटिंग वगैरे झालं होतं आणि...”

"तेव्हा कुणीही पाठीशी उभं राहिलं नाही", 'वेड' चित्रपटाबद्दल रितेश देशमुखचा मोठा खुलासा, म्हणाला, "शूटिंग वगैरे झालं होतं आणि...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.