बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टीतली लोकप्रिय जोडी म्हणजेच रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख. या जोडीला इंडस्ट्रीत आदर्श जोडी मानलं जातं. रितेश-जिनिलिया नेहमीच त्यांच्या मजेशीर रिल्समुळे चर्चेत असतात. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही दोघं चाहत्यांबरोबर शेअर करत असतात आणि त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. त्यांचे अनेक व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. अशातच रितेशने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
रितेश-जिनिलिया नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ शेअर करीत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. अशातच रितेशने नुकतीच एक नवीन रील त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये रितेशने कुर्ता परिधान केला आहे, तर जिनिलियाने भरजरीस साडी परिधान केली आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया रितेशला तिच्यामागे एक गाणं म्हणायला सांगते. यावर रितेश ते गाणं म्हणतो. पण ते गाणं म्हणताना एक चूक करतो आणि त्यामुळे तो गोंधळून जातो.
या व्हिडीओमध्ये जिनिलिया रितेशला “गाण्याची एक ओळ मी गाते आणि एक तू गा” असं म्हणते आणि ती गाण्याच्या “जाती हूं में” ही ओळ गाते. यावर रितेश चुकून “जल्दी तू जा’ असं म्हणतो. ही ओळ गाताच त्याचा गोंधळ उडतो आणि त्याला आपली चूक झाली असल्याचे कळताच तो “जल्दी है क्या” असं म्हणत त्याची चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. पुढे जिनिलिया रितेशकडे रागात बघते. रितेश- जिनिलियाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
रितेश- जिनिलियाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओखाली एकाने “रितेशच्या तोंडून चुकून खरं निघालं” अशी कमेंट केली आहे. तर एकाने “आजच्या या घटस्फोटाच्या जगात सर्वांना असं प्रेम मिळूदेत” अशी कमेंट केली आहे. याशिवाय अनेकांनी “माझी आवडती जोडी, दादा आणि वाहिनीची जोड़ी १, हृदयातले वाक्य चुकून तोंडातून निघालं” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. नेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.