मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता अभिजीत खांडकेकर व अभिनेत्री सुखदा खांडकेकर. अभिजीत व सुखदा नेहमीच त्यांचे एकत्र फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बऱ्याच कार्यक्रमांना ही जोडी एकत्र हजेरी लावतानाही पाहायला मिळते. मालिकांमुळे अभिजीत नेहमीच चर्चेत असतो. तर सुखदाही तिच्या अभिनयामुळे व नृत्यामुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. शिवाय सुखदाच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. अशातच सुखदा खांडकेकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या पतीसह पूजा सावंतच्या लग्नात हजेरी लावताना दिसली. (Sukhada Khandkekar Nails)
सुखदा व अभिजीत हे पूजा सावंतच्या लग्नाला पोहोचले होते. सुखदा व पूजा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. सुखदा अगदी पूजाच्या कुटुंबातील एक असल्यासारखी तिच्या घरात काम करताना दिसली. हळद, मेहंदी, संगीत व लग्न अशा सर्वच कार्यक्रमांमध्ये सुखदा सहभागी झाली. पूजाच्या लग्नासाठी अभिजीत व सुखदा यांनी मॅचिंग केलेलं पाहायला मिळाला. सुखदाने यावेळी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती तर बायकोला मॅचिंग असा अभिजीतने कुर्ता परिधान केला होता.

सुखदाने पूजा व सिद्धेशच्या लग्नासाठी स्पेशल नेलआर्ट केले होते. सुखदाची नख ही पूजाच्या लग्नात भाव खाऊन गेली. सुखदाने या नखांचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. “नेलकॅप्स, माझा नवीन आवडता दागिना”, असं कॅप्शन देत सुखदाने हा फोटो शेअर केला आहे. तिच्या नखांची चर्चा सर्वत्र झाल्याने त्याचा एक क्लोजअप फोटोही तिने शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले आहे की, “सगळ्यांच्या मागणीनुसार या नखांचा मी क्लोज अप फोटो शेअर करत आहे. सोन्याचा थर असलेल्या या चांदीच्या नेलकॅप्स आहेत”.
पूजा व सिद्धेशच्या लग्नात गश्मीर महाजनी व त्याची पत्नी गौरी महाजनी, भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, मृण्मयी देशपांडे, वैदेही परशुरामी, गौरी नलावडे, अंकुश चौधरी, जयवंत वाडकर, समीर चौघुले, मनवा नाईक, अभिजीत केळकर, माधव देवचक्के, सचिन पिळगांवकर, सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी हजेरी लावली होती.