रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हटके ड्रेसिंग स्टाइल, महागडे दागिने अन्…; पूजा सावंतच्या लग्नात मराठी कलाकारांचीच अधिक हवा, कुटुंबियांना घेऊन आले आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 29, 2024 | 3:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Narathi News

पूजा सावंत सिद्धेश चव्हाण विवाह सोहळा

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नाची. अगदी शाही थाटामाटात पूजा सावंतचा विवाहसोहळा संपन्न झाला. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. पूजाच्या या भव्य लग्नसोहळ्याच्या फोटो, व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पूजा व सिद्धेश दोघांनीही त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासास सुरुवात केली आहे. दोंघाच्या बॉलिवूड स्टाइलच्या या लग्नसोहळ्याची विशेष चर्चा रंगली. सकाळी लग्न व संध्याकाळी रिसेप्शन असा लग्नाचा घाट त्यांनी घातलेला पाहायला मिळाला.

पूजाच्या लग्नात तिच्या जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व कलाकार मंडळी उपस्थित होते. पूजाच्या लग्नाला मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेकांनी कुटुंबासह पूजाच्या लग्नात हजेरी लावली होती. पूजाच्या लग्नात कलाकार मंडळी भाव खाऊन गेलेले पाहायला मिळाले. त्यांच्याही पारंपरिक, मॉडर्न लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तर अनेकांनी अभिनेत्रीला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या.

आणखी वाचा – Video : चव्हाणांची सून होताच मंडपातच पूजा सावंतने काय केलं पाहा; नवऱ्याचीही बायकोवरुन नजर हटेना, सगळ्यात सुंदर व्हिडीओ समोर

पूजा व सिद्धेशच्या लग्नात गश्मीर महाजनी व त्याची पत्नी गौरी महाजनी, मृन्मयी देशपांडे, वैदेही परशुरामी, गौरी नलावडे, अंकुश चौधरी, जयवंत वाडकर, समीर चौघुले, मनवा नाईक, अभिजीत केळकर, माधव देवचक्के, सचिन पिळगांवकर, सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी हजेरी लावली होती. तर अमोल कोल्हे त्याच्या कुटुंबियांसह तसेच सुनील बर्वे त्याच्या पत्नीसह पूजाच्या लग्नाला उपस्थित होता. इतकंच नव्हे तर, पूजाच्या खास मैत्रिणी प्रार्थना बेहेरे व तिचा पती, तसेच सुखदा खांडेकर व तिचा पती अभिजीत खांडकेकर पूजाच्या लग्नापुर्वीच्या विधींपासून अगदी लग्नापर्यंत तिच्याबरोबर होते.

आणखी वाचा – अनंत अंबानीच्या होणाऱ्या सासऱ्याची आहे इतकी संपत्ती, स्वतः करतात हे काम, एकूण कमाई आहे…

एकूणच या कलाकार मंडळींनी पूजा व सिद्धेशच्या लग्नाची शोभा वाढविली. सर्वच कलाकार यावेळी धमाल, मस्ती करताना दिसले. पूजा व सिद्धेशचा लग्नातील लूकही साऱ्यांच्या पंसतीस पडला. वरमाला घालताना दोघांचा पारंपरिक लूक खूप खास होता तर रिसेप्शन सोहळ्यासाठीची पूजाची लाल रंगाची भरजरी साडी व सिद्धेशची काळ्या रंगाची शेरवानी लक्षवेधी ठरली.

Tags: entertainmentmarathi celebrityPooja Sawant Siddhesh ChavanPooja Sawant Siddhesh Chavan Weddingpooja sawant wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Shazia Manzoor hitting Sherry Nanha video viral on social media

Video : हनिमूनबाबत विचारताच प्रसिद्ध अभिनेत्यावर भडकली गायिका, चालू शोमध्ये कानाखाली मारु लागली अन्...; संपूर्ण प्रकरण कॅमेऱ्यात कैद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.