शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : चव्हाणांची सून होताच मंडपातच पूजा सावंतने काय केलं पाहा; नवऱ्याचीही बायकोवरुन नजर हटेना, सगळ्यात सुंदर व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 29, 2024 | 1:17 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Narathi News

पूजा सावंत सिद्धेश चव्हाण विवाह सोहळा

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंतचं लग्न चर्चेत होतं. अखेर काल दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पूजा सावंत विवाहबंधनात अडकली. पूजा सावंतने तिचा बॉयफ्रेंड सिद्देश चव्हाणसह सातफेरे घेत लग्न केले. पूजा व सिद्धेशच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजाने सिद्धेशसह लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासातील एक पाऊल पुढे टाकलं आहे. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व कलाकार मंडळींच्या उपस्थितीत पूजाचं अगदी थाटामाटात लग्न झालं असल्याचं समोर आलं आहे.

पूजाच्या विवाहसोहळ्यात अनेक व्हिडीओ व फोटो समोर आले आहेत. बॉलिवूड स्टाईलने अभिनेत्रीने उरकलेल्या या लग्नाला पारंपरिक टच देत तिने मराठमोळी परंपरा जपली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सावंतांची लेक ते चव्हाणांची सून इथरवरचा पूजाचा प्रवास संपन्न झाला आहे. पूजा तिच्या लग्नात खूप आंनदी असल्याचं पाहायला मिळालं. चेहऱ्यावर हसू व समाधान या दोन्ही गोष्टींनी अभिनेत्रींच्या नववधूच्या सौंदर्यात आणखीनंच भर पडली होती.

आणखी वाचा – नऊवारी साडी, हिरवा चूडा अन्…; मराठी परंपरा जपत पूजा सावंतने असं केलं बॉलिवूड स्टाइल लग्न, नवऱ्याचा हात हातात घेतला आणि…

पूजाने सप्तपदी घेताना पिवळ्या रंगाची गुलाबी काठांची नऊवारी साडी नेसली होती, नाकात नथ, हिरवा चुडा व सोन्याच्या दागिन्यांनी तिचा लूक खूप खास दिसत होता. तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी या खास दिवसासाठी निवडली होती. तर रिसेप्शनसाठी पूजाने लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती तर सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. पूजा व सिद्धेश दोघेही लग्नात खूपच सुंदर व आनंदी दिसत होते. पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या दोघांच्या शाही लग्नाची झलक पाहायला मिळाली.

आणखी वाचा – “ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका…”, लग्नानंतर पूजा सावंतसाठी नवऱ्याचा हटके स्टाईल उखाणा, उपस्थितांकडून कौतुकाचा वर्षाव

सौभाग्यवती झाल्यानंतर पूजा खूपच खूश दिसत होती. दरम्यान उपस्थितांचे आभार मानत ती म्हणाली की, “माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानू इच्छिते की, वेळेत वेळ काढून, काम बाजूला ठेवून तुम्ही माझ्या या खास दिवसासाठी उपस्थिती लावली. मी खूप एन्जॉय केलं. आपण आपल्या लग्नाची, बायको होण्याची स्वप्न पाहत असतो, आणि आता लग्नाचे विधी सुरु होते तेव्हा मी एक-एक विधी एन्जॉय करत होते. माझ्या आयुष्यातील या अगदी अचूक माणसाच्या शोधासाठी मी इतकी वर्षे थांबले होते. सिद्धेश माझ्या आयुष्यात आलास त्याबद्दल तुझेही आभार”, असं ती म्हणाली.

Tags: entertainmentmarathi actressPooja Sawant Siddhesh ChavanPooja Sawant Siddhesh Chavan Weddingpooja sawant wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Fighter movie OTT release

हृतिक रोशन व दीपिका पदुकोण यांचा ‘फायटर’ लवकरच ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, इतक्या कोटी रुपयांना झाला करार   

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.