शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला बायकोचा वाढदिवस, रोमँटिक फोटो समोर, म्हणाला, “सोनू…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 30, 2024 | 5:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aastad Kale and Swapnali Patil shared their romantic photos from paris

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला बायकोचा वाढदिवस, रोमँटिक फोटो समोर, म्हणाला, "सोनू..."

मराठी मालिका, चित्रपट व रिअ‍ॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्तादने ‘पुढचं पाऊल’, ‘अग्निहोत्र’ अशा लोकप्रिय मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आस्तादची पत्नी स्वप्नाली हेदेखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आस्ताद काळे व स्वप्नाली पाटील ही छोट्या पडद्यावरील काही लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी आहे. सोशल मीडियावर दोघे नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी नुकतेच शेअर केलेले फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

अभिनेत्री व आस्तादची पत्नी स्वप्नाली पाटीलचा नुकताच २५ मार्च रोजी वाढदिवस झाला आणि या वाढदिवसाचे औचित्य साधत दोघे नवरा-बायको परदेशात फिरायला गेले आहेत. आस्ताद-स्वप्नालीने नुकतेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही खास फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोद्वारे तिने आस्तादला धन्यवाद म्हटले आहे. स्वप्नालीने “वाढदिवसानिमित्त सर्वात सुंदर व अप्रतिम भेटवस्तू दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आस्ताद” असं म्हणत पॅरिसमध्ये वाढदिवस साजरा केल्याचे सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnalee Patil (@patilswapna)

आणखी वाचा – ओटी भरणाच्या कार्यक्रमात बायकोची काळजी घेताना दिसला रोनित पिसे, कार्तिकी गायकवाडचा हात हातात धरला अन्…; म्हणाला, “आगमनाची तयारी…”

त्याचबरोबर यापुढे तिने “माझ्या वाढदिवसाच्या खास दिवशी मला शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे खूप खूप आभार” असं म्हणत सर्वांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली आहे. आस्ताद व स्वप्नाली यांनी पॅरिसमधील आयफेल टॉव्हर येथील खास फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाजही पाहायला मिळत आहे. दरम्यान, स्वप्नालीने शेअर केलेल्या या खास फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – रात्रीचे स्मशानामध्ये जायचे सद्गुरु जग्गी वासुदेव, जळत्या चितेमधून शरीराचे तुकडेही काढायचे अन्…; स्मशानामध्ये नेमकं ते काय करायचे?

दरम्यान,  ‘पुढचं पाऊल’ या मालिकेच्या सेटवर आस्ताद व स्वप्नाली यांची पहिली भेट झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात प्रचंड भांडणं होतं. मात्र हळूहळू प्रेम फुलू लागलं आणि काही वर्ष डेट केल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. ‘बिग बॉस मराठी’मध्ये आस्तादने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर अखेर सप्टेंबर २०२१ साली दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. 

Tags: aastad kalemarathi entertainment newsSwapnali Patil
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Dia Mirza wished her step daughter Samaira on her 15th birthday by sharing special photo

सावत्र मुलीबरोबर असं आहे दिया मिर्झाचं नातं, फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही कौतुक, म्हणाले, "स्वतःची आईही असं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.