Kiran Rao Appendix Surgery: बॉलीवूड अभिनेता आमिर खानची पुर्वश्रमीची पत्नी किरण राव हिच्या प्रकृतीबद्दल नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. किरण रावची अपेंडिक्स शस्त्रक्रिया करण्यात आली यासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तिची शस्त्रक्रिया झाली असून तिने सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना याची माहिती देत तिच्या प्रकृतीबद्दल सांगितलं आहे. रुग्णालयातून तिने ही पोस्ट शेअर करत तिच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
किरण रावने पोस्ट शेअर करत लिहिलं, “मी २०२६ मध्ये पार्टी करण्यासाठी सज्ज होते, पण तेव्हाच माझ्या अपेंडिक्सने मला आठवण करून दिली, थोडा धीर धर…एक दीर्घ श्वास घे आणि कृतज्ञ रहा. मी मॉडर्न मेडिसिनची खूप आभारी आहे. मला अजूनही समजत नाही की, १०.५ मिमी कॅथेटरने ते संपूर्ण १२ मिमीचे अपेंडिक्स कसे काढले गेले. सुदैवाने, मी डॉक्टर नाही. मी डॉ. कायोमार्ज कपाडिया आणि संपूर्ण सर्जिकल टीम, सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये माझी खूप चांगली काळजी घेण्यासाठी आणि माझ्यासाठी वेळ काढणाऱ्या माझ्या मित्रांचे आणि कुटुंबाचे आभारी आहे. जे माझ्या मदतीसाठी धावत आले. माझे इतर प्रियजन जे माझे सुजलेले ओठ पाहून हसत होते. ही एक ऍलर्जीक रिऍक्शन होती.’ आता माझे ओठ पुन्हा नॉर्मल झाले आहेत आणि दुर्दैवाने ते आता ग्लॅमरस राहिलेले नाही. मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे, आणि मी घरी परतले आहे.” मी नवीन वर्षाची सुरुवात आरामात करण्यास तयार आहे.” (Kiran Rao Appendix Surgery)
पुढे ती म्हणाली, “२०२५ हे वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या प्रियजनांसाठी खूप चांगलं गेलं. आशा आहे की, २०२६ हे वर्ष सगळ्यांसाठी प्रेमळ, दयाळू आणि मजेशीर आणि चांगलं हवामान असलेलं ठरेल.” तर किरणच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी ‘लवकर बरी हो’ अशा कंमेंट्स केल्या आहेत. (Kiran Rao Appendix Surgery)




