सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो…”, ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारताच अशोक सराफांचे डोळे पाणावले, म्हणाले, “हे ऋण कधीही…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 23, 2024 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ashok Saraf expressed his feelings after receiving the Maharashtra Bhushan Award 2023 see the details

“ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो...”, 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार स्वीकारताच अशोक सराफांचे डोळे पाणावले, म्हणाले, “हे ऋण कधीही...”

आपल्या बहारदार अभिनयाने नाटकाचे रंगमंच, चित्रपट व टीव्हीची स्क्रीन अन् बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेला भारावून टाकणारे अभिनेते म्हणजे म्हणजे अशोक सराफ. आपल्या विनोदी अभिनयाने कधी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू तर कधी आशयघन भूमिका साकारत डोळ्यात टचकन पाणी आणणारे अभिनेते म्हणून त्यांची ख्याती आहे. अशातच मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर सर्वच स्तरातून अशोक सराफ यांचं कौतुक होताना पाहायला मिळालं. मुंबईतील वरळे येथे हा दिमाखदार सोशला आयोजित करण्यात अलया होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

हा पुरस्कार सोहळा स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी त्याचे मनोगत व्यक्त करताना असं म्हटलं की, “महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुरस्कार मला प्रदान केलात याचा मला खरोखर आनंद होत आहे. ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो, जी माझी कर्मभूमी आहे अशा पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं. याशिवाय दुसरी आनंदाची गोष्ट कोणती नाही. यानिमित्ताने मी महाराष्ट्र शासनाचे मन:पूर्वक आभार मानतो की त्यांनी मला या पदाला नेऊन बसवलं. कारण ज्या लोकांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशा मोठ्या लोकांमध्ये मला त्यांची बसवलं याचा मला अधिक आनंद आहे”.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२३’ पुरस्कार प्रदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान

यापुढे अशोक सराफ यांनी भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “माझ्यासह काम करणाऱ्या लोकांनी मला सतत पाठिंबा दर्शवला म्हणून इथपर्यंत पोहोचलो. महाराष्ट्रातला प्रेक्षक हा बुद्धिमान व अतिशय खडूस प्रेक्षक आहे.  कारण त्यांना आवडलं तर आवडलं नाहीतर नाही. अशा लोकांसमोर काम करण ही तारेवरची कसरत असते. त्यांना आवडलं तर ते निश्चित डोक्यावर घेतील, पण तुम्ही त्यांच्या समोर काहीही सादर करू शकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना काय आवडेल याच नेहमी भान ठेवावं लागत. तसेच यानिमित्ताने समस्त प्रेक्षक वर्गाचे आभार मानतो. प्रेक्षकांचे हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. पण माझ्या हृदयात तुम्ही दिलेलं प्रेम सतत राहील”.

आणखी वाचा – “मराठी मातीतला अस्सल हिरा…”, मुख्यंमत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र भूषण अशोक सराफांचं केलं कौतुक, म्हणाले, “यश, पैसा, प्रसिद्धी अन्…”

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’सारख्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणे, हे त्यांनी आजवर केलेल्या कामाची खूप मोठी पोचपावती असं म्हणणं वावगं ठरणार नाही. दरम्यान, अशोक सराफ यांच्या या सर्वोच्च सन्मानामुळे कलाकार मंडळी, राजकीय नेते इतकंच नव्हे तर समस्त प्रेक्षकवर्गाकडून अशोक सराफ यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Hemangi Kavi Special Post

"मराठीतच बोलणार कारण…", हिंदी मालिकेसाठी पुरस्कार मिळताच स्टेजवर मराठीत बोलू लागली हेमांगी कवी, उपस्थितही 'जय महाराष्ट्र' बोलू लागले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.