आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. आयराने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह लगीनगाठ बांधली. आयरा व नुपूरच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरलेले पाहायला मिळाले. या लग्नामुळे नुपूर व आयरा यांची जोडी विशेष चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. आयरा व नुपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुपूर हा फिटनेस फ्रिक असून तो पेशाने जिम ट्रेनर आहे. (Nupur Shikhare Funny Video)
सोशल मीडियावर नुपूर नेहमीच फिटनेसबद्दल व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच नुपूरच्या एका सोशल मीडियावरील एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये नुपूरसह त्याची आई देखील पाहायला मिळत आहे. नुपूर व त्याच्या आईचा हा गमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुपूर व त्याची आई प्रीतम यांचा हा व्हिडीओ फार चर्चेत आला आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नुपूरची आई नूपुरला झाडूने मारताना दिसत आहे. हा गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नुपूरने ‘आईचे फटके’ असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओत नुपूरची आओ त्याला विचारत आहे की, “काय रे काय करतोय तू”, त्यावर नुपूर “हिलींग करतोय”, असं उत्तर देतो. ‘”कामावर जायचं नाही का?”, असं आईने विचारल्यावर नुपूर म्हणतो, “नाही. आजपासून मी काम सोडलं आहे. आता मी हिलींग करणार.” हे ऐकून नुपूरची आई स्वयंपाक घरातून झाडू घेऊन येतात, ते पाहताच नुपूर “जातो, जातो”, म्हणत घराबाहेर पडतो. त्यानंतर नुपूरची आई “एवढा मोठा घोडा झाला आहे आणि कामं सोडून हिलींग करतो”, अशी बडबड करताना दिसत आहेत.
नुपूर व त्याच्या आईचा हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या चांगलंच चर्चेत आला असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. नुपूर व त्याच्या आईचा फणी व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर कमेंट व लाईक्सचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.