मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व त्याची पूर्वश्रीमीची पत्नी किरण राव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. घटस्फोट घेतल्यानंतरही दोघांमधील बॉण्डिंग काहींना भावतं, तर काहींना ते खटकतं. बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खानने त्याची माजी पत्नी किरण रावसह ‘न्यूज१८ इंडिया’च्या ‘न्यूज18 इंडिया चौपाल’मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्याने किरणबरोबर असलेल्या त्याच्या नात्याबद्दल भाष्य केलं. (Aamir Khan On Ex Wife Kiran Rao)
जेव्हा त्याला विचारण्यात आले की, “आमिर व किरणच्या चाहत्यांना समजत नाही आहे की तुम्ही अजूनही एकत्र कसे काम करता, त्यात काही अडचण नाही का?, तुम्ही असंही म्हणता की, आम्ही वैयक्तिकरित्या एकत्र नाही”. या प्रश्नाचे उत्तर देताना आमिर म्हणाला, “ठीक आहे, घटस्फोटानंतरही आम्ही का आहोत म्हणजे, कोणा डॉक्टरने असं सांगितलं आहे का की, घटस्फोटानंतर तुम्ही लगेच शत्रू होता?” असं उत्तर दिलं. पत्नीबरोबरच्या नात्याबाबत बोलताना आमिर खान म्हणाला, “मानवीदृष्ट्या आम्ही एकमेकांशी जोडलेले आहोत आणि भावनिकरित्याही एकमेकांसह जोडलो आहोत. आम्ही नेहमीच असेच राहू. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. मला वाटते किरणचे मन अप्रतिम आहे” असंही तो म्हणाला. यादरम्यान आमिरने गाण्याचे धडे घेत असल्याचंही सांगितलं.
आमिर खान हसत हसत म्हणाला की, “मला वाटते की, किरण माझ्या आयुष्यात आली हे माझे भाग्य आहे आणि आमचा प्रवासही माझ्यासाठी खूप आनंददायी होता. आम्ही व्यावसायिक व वैयक्तिकरित्या एकत्र खूप काम केले आहे आणि भविष्यातही आम्ही एकत्र असेच काम करु” असंही तो म्हणाला. आमिर खान व किरण राव यांनी आजवर एकत्र बरंच काम केलं आहे.
आमिर पुढे म्हणाला, “आजकाल मी गाणे शिकत आहे. सुचित्राजी माझ्या गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य झालो आहे. त्यांच्याकडून मी भारतीय क्लासिक गाण्यांचे धडे घेत आहे”, असंही तो म्हणाला. त्याचवेळी आमिरला प्रेक्षक बदलताना दिसतात का, असे विचारले असता आमिर म्हणाला, ”मला वाटते समाज बदलत आहे. प्रेक्षक नेहमी बदलत असतात. अशी कोणतीही वेळ नाही जेव्हा ते स्थिर असतात. आपण सगळे बदलत राहतो, आणि प्रत्येकजण प्रगती करत असतो” असंही तो म्हणाला.