सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“घटस्फोटानंतर लोक लगेच शत्रू होतात अन्…”, किरण रावबरोबरच्या नात्याबाबत आमिर खान स्पष्टच बोलला, म्हणाला, “काही अडचण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 5, 2024 | 6:48 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
aamir khan and kiran rao

"घटस्फोटानंतर लोक लगेच शत्रू होतात अन्...", किरण रावबरोबरच्या नात्याबाबत आमिर खान स्पष्टच बोलला, म्हणाला, "काही अडचण..."

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व त्याची पूर्वश्रीमीची पत्नी किरण राव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. घटस्फोट घेतल्यानंतरही दोघांमधील बॉण्डिंग काहींना भावतं, तर काहींना ते खटकतं. बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खानने त्याची माजी पत्नी किरण रावसह ‘न्यूज१८ इंडिया’च्या ‘न्यूज18 इंडिया चौपाल’मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्याने किरणबरोबर असलेल्या त्याच्या नात्याबद्दल भाष्य केलं. (Aamir Khan On Ex Wife Kiran Rao)

जेव्हा त्याला विचारण्यात आले की, “आमिर व किरणच्या चाहत्यांना समजत नाही आहे की तुम्ही अजूनही एकत्र कसे काम करता, त्यात काही अडचण नाही का?, तुम्ही असंही म्हणता की, आम्ही वैयक्तिकरित्या एकत्र नाही”. या प्रश्नाचे उत्तर देताना आमिर म्हणाला, “ठीक आहे, घटस्फोटानंतरही आम्ही का आहोत म्हणजे, कोणा डॉक्टरने असं सांगितलं आहे का की, घटस्फोटानंतर तुम्ही लगेच शत्रू होता?” असं उत्तर दिलं. पत्नीबरोबरच्या नात्याबाबत बोलताना आमिर खान म्हणाला, “मानवीदृष्ट्या आम्ही एकमेकांशी जोडलेले आहोत आणि भावनिकरित्याही एकमेकांसह जोडलो आहोत. आम्ही नेहमीच असेच राहू. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. मला वाटते किरणचे मन अप्रतिम आहे” असंही तो म्हणाला. यादरम्यान आमिरने गाण्याचे धडे घेत असल्याचंही सांगितलं.

आणखी वाचा – “पाकड्या गायकाला बॉलिवूडमध्ये…”, अतिफ अस्लमच्या पुनरागमनावर मनसे आक्रमक, अमेय खोपकर म्हणाले, “फाट्यावर मारण्याची…”

आमिर खान हसत हसत म्हणाला की, “मला वाटते की, किरण माझ्या आयुष्यात आली हे माझे भाग्य आहे आणि आमचा प्रवासही माझ्यासाठी खूप आनंददायी होता. आम्ही व्यावसायिक व वैयक्तिकरित्या एकत्र खूप काम केले आहे आणि भविष्यातही आम्ही एकत्र असेच काम करु” असंही तो म्हणाला. आमिर खान व किरण राव यांनी आजवर एकत्र बरंच काम केलं आहे.

आणखी वाचा – अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या विधींमध्ये नाचणार आलिया भट्ट-रणबीर कपूर, तयारी करतानाचा व्हिडीओ समोर

आमिर पुढे म्हणाला, “आजकाल मी गाणे शिकत आहे. सुचित्राजी माझ्या गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य झालो आहे. त्यांच्याकडून मी भारतीय क्लासिक गाण्यांचे धडे घेत आहे”, असंही तो म्हणाला. त्याचवेळी आमिरला प्रेक्षक बदलताना दिसतात का, असे विचारले असता आमिर म्हणाला, ”मला वाटते समाज बदलत आहे. प्रेक्षक नेहमी बदलत असतात. अशी कोणतीही वेळ नाही जेव्हा ते स्थिर असतात. आपण सगळे बदलत राहतो, आणि प्रत्येकजण प्रगती करत असतो” असंही तो म्हणाला.

Tags: aamir khanaamir khan and kiran raoaamir khan kiran rao relationAamir Khan On Ex Wife Kiran Raoentertainmentkiran rao
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Actress Smita Gondkar informed that a special person close to her has passed away by post.

सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर झाली भावुक, म्हणाली, “दु:ख शब्दांमध्ये...”  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.