मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर झाली भावुक, म्हणाली, “दु:ख शब्दांमध्ये…”  

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2024 | 6:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress Smita Gondkar informed that a special person close to her has passed away by post.

सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर झाली भावुक, म्हणाली, “दु:ख शब्दांमध्ये...”

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरांत पोहोचले. ‘पप्पी दे पारुला’ म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशातच अभिनेत्रीवर नुकताच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या एका खास व्यक्तीचं निधन झालं असून सोशल मीडियाद्वारे स्मिताने यासंबंधित माहिती दिली आहे. श्री रमेश अश्वथराव गोंदकर असं त्यांचं नाव असून स्मिताने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ही माहिती दिली आहे. स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने असं म्हटलं आहे की, “अत्यंत दुःखाने व जड अंत:करणाने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की आमचे लाडके श्री रमेश अश्वथराव गोंदकर यांचे काल ४ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. आम्ही आमचे दु:ख आता शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण ते आमच्या कायम स्मरणात राहतील”

आणखी वाचा – वडील, बहिण, भाचीने दिल्या वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा, मात्र बायकोने फिरवली पाठ, ऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये पुन्हा बिनसलं?

याबरोबर तिने त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दलचीही माहिती दिली आहे. त्यांच्या अचानक निघून जाण्याने अभिनेत्रीला दु:ख अनावर झाले असून त्यांच्या निधनावर स्मिताने शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिली आहे.

आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली, ‘या’ महिन्यात घरी येणार नवा पाहुणा, कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण

दरम्यान, स्मिता नुकतीच बलोच या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच स्मिताच्या जवळील खास व्यक्तीच्या निधनावर सर्वांनीच दु:ख व्यक्त केलं आहे.

Tags: निध बातमीस्मिता गोंदकरमराठी अभिनेत्रीमराठी बातमीदु:खद निधनदु:खद बातमीdeath newsmarathi actressMarathi Actress NewsMarathi newsSad DeathSad NewsSmita Gondkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Gashmeer Mahajani Incident

कुजलेल्या वासाने हैराण, आईला उलट्या अन्…; गश्मीर महाजनीला लागलेली वडिलांच्या मृत्यूची चाहूल, म्हणाला, "तो वास फक्त मलाच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.