Aamir Khan Makes Mannat For His Son : सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांची मुलंही आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत सिनेविश्वात कार्यरत आहेत. यापैकी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे आमिर खान. आमिर खान बरेचदा त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आमिरची दोन्ही मुलंही म्हणजे जुनैद व आयरादेखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच आमिरचा लेक जुनैद त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या आगामी सिनेमाचे नाव ‘लव्हयापा’ आहे. यामध्ये तो श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरसह पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
‘लव्हयापा’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जुनैदचा हा पहिलाच चित्रपट आहे, जो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. याआधी त्याने ‘महाराज’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, परंतु हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आणि त्याचे खूप कौतुक झाले. तर जुनैदच्या या यशासाठी त्याला आमिरने शुभेच्छा दिल्या आहेत.
‘पिंकविला’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, जुनैद खानचा ‘लव्हयापा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यास आमिर खान धूम्रपान सोडेल, असे सांगण्यात आले आहे. याबाबत त्याने शपथ घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. यात ग्रुषा कपूर, आशुतोष राणा, तन्विका परळीकर आणि कॉमेडियन किकू शारदा देखील दिसणार आहेत. हा चित्रपट अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्याने आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ देखील दिग्दर्शित केला होता.
आणखी वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीची तयारी करत आहे पूजा सावंत, खास दागिन्यांनी वेधलं लक्ष, व्हिडीओ समोर
सोनू सूदचा ‘फतेह’ हा चित्रपट १० जानेवारीला पडद्यावर येणार आहे, ज्यात जॅकलिन फर्नांडिस आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही भूमिका आहेत. ‘लव्हयापा’ राम चरण आणि कियारा अडवाणीच्या ‘गेम चेंजर’बरोबरही टक्कर देणार आहे. यापूर्वी ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत जुनैद खानने वडील आमिर खान यांच्याशी केलेल्या तुलनेवर प्रतिक्रिया दिली होती. त्याची उंची जास्त आणि वडिलांची कमी, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स सारखा असू शकत नाही, असे त्याने सांगितले होते.