SRK-Gauri Photos : किंग खान शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहरुख नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. जगभरात शाहरुखचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुख व्यावसायिक आयुष्याबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. शाहरुख खानची प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. शाहरुखने गौरी खानशी लग्न केले. हे कपल बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. शाहरुख व गौरी दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. शाहरुख मुस्लिम आणि गौरी हिंदू धर्मातील आहे. त्यांच्या धर्मामुळे दोघांमध्ये कधीही मतभेद झाले नाहीत. अशातच लग्नाच्या अनेक वर्षांनंतर आता काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यानंतर गौरीने इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे बोलले जात आहे. पण हे फेक फोटो असल्याचं समोर येत या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
शाहरुख व गौरीच्या घरातील वातावरण नेहमीच धार्मिक राहिले आहे. दोघांकडे दोन्ही धर्माचे सण साजरे केले जातात. शाहरुख व गौरी या दोघांनीही अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्यांची तीनही मुले दोन्ही धर्मांचे पालन करतात. मात्र हा फेक फोटो समोर आल्यानंतर गौरीच्या धर्मांतरणावरुन वाद सुरु झाला आहे.
हे फोटो मुस्लिमांचे सर्वात पवित्र ठिकाण असलेल्या मक्का येथील आहेत. फोटोंमध्ये शाहरुख खान आणि गौरी खान मक्कामधील पवित्र काबासमोर पोज देताना दिसत आहेत. हे फोटो पूर्णपणे बनावट आहेत. ‘कॉफी विथ करण’मध्ये गौरीने एकदा सांगितले होते की, “आमच्या घरात दिवाळी, होळी किंवा ईद सर्व सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. शाहरुख कामात व्यस्त आहे, त्यामुळे सणाची तयारी मी घरीच करते. मी हिंदू आहे, त्यामुळे त्याचा परिणाम मुलांवर जास्त झाला आहे”.
आणखी वाचा – अंकिता वालावलकर होणाऱ्या नवऱ्यासह योगिता चव्हाणच्या भेटीला, फोटो शेअर करत म्हणाली, “दोन अतिविचारी मुली…”
गौरी पुढे म्हणाली, “हिंदू असूनही मी माझ्या पतीच्या धर्माचा पूर्ण आदर करते. पण मी माझा धर्म कधीच बदलला नाही. आम्ही दोन्ही धर्मांमध्ये संतुलन राखतो”. शाहरुख व गौरी यांची जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. बरेचदा दोघेही कामाच्या गड्बडीतून वेळात वेळ काढत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात.