नवीन वर्ष सुरु झालं की, पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांत हा सण स्त्रियांच्या अतिशय आवडीचा सण. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि साज श्रृंगार, नटणं हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचा विषय. हळदी कुकुंवाची देवाण-घेवाण करत हा दिवस अतिशय उत्सहात आणि आनंदात साजरा केला जातो. लग्न झाल्यानंतर पहिलीच मकर संक्रांत असेल तर नवरा-बायकोसाठी ही अत्यंत खास असते. यंदा अनेक मराठी कलाकार मंडळी त्यांच्या लग्नानंतरचा पहिला मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहेत. यामध्ये अभिनेत्री पूजा सावंतचाही समावेश आहे. (pooja sawant fisrt makar sankranti)
अभिनेत्री पूजा सावंतने गेल्यावर्षी म्हणजे (२८ फेब्रुवारी २०२३ रोजी) लग्नबंधनात अडकली. तिने शाही पद्धतीने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. पूजाने साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर तिच्या लग्नाची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती, अखेर २८ फेब्रुवारी रोजी थाटामाटात तिचा लग्नसोहळा पार पडला. पूजाने लग्नात पिवळ्या रंगाची गुलाबी काठांची नऊवारी नेसली होती, नाकात नथ व सोन्याच्या दागिन्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केला. तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. लग्नानंतर अभिनेत्री परदेशात गेली. मात्र लग्नानंतरचे अनेक मराठी सण, उत्सव व समारंभ अगदी थाटामाटात आणि उत्साहात साजरे केले. अशातच आता तिला पहिल्या मकर संक्रांतीचे वेध लागले आहेत.

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या भावाची लगीनघाई, शेअर केले लग्न ठरल्यानंतरचे फोटो, शुभेच्छांचा वर्षाव
पूजाही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या या फोटोला चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच तिने येत्या मकर संक्रांतीनिमित्त इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे “वेध मकरसंक्रांतीचे” असं म्हणत तिने हळव्याच्या दागिन्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गळ्यातील अनेक आकर्षक हळव्याच्या वस्तू पाहायला मिळत आहे. तसंच या दागिन्यांमध्ये हळव्याने सजवलेले खास मंगळसूत्रही लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – अंकिता वालावलकर होणाऱ्या नवऱ्यासह योगिता चव्हाणच्या भेटीला, फोटो शेअर करत म्हणाली, “दोन अतिविचारी मुली…”
पूजा आणि सिद्धेशच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर दोघांचं अरेजं मॅरेज आहे. एका मुलाखतीत पूजानं तिची लव्हस्टोरी शेअर केली होती. अरेंज कम लव्ह मॅरेज, असं लग्न ठरल्याचं तिनं सांगितलं. लग्नाच्या आधी पूजा मुसाफिरा सिनेमात झळकली होती. त्यानंतर अद्याप अजून तिचा कोणता प्रोजेक्ट समोर आलेला नाही. त्यामुळे आता अभिनेत्री कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? यांची सर्वजण वाट पाहत आहेत. तसंच अनेकजण तिच्या मकरसंक्रांतीसाठीसुद्धा उत्सुक असतील हे नक्की…