स्टारकिड्स आणि बॉलिवूड हे गणित काही वेगळंच आहे. इंडस्ट्रीमध्ये स्टारकिड्सला सहज काम मिळतं, तेच चित्रपटाचे मुख्य कलाकार होतात असं बरंच बोललं जातं. मात्र काही कलाकार याला अपवाद आहेत. काही कलाकारांच्या मुलांना तितकी प्रसिद्धी किंवा काम मिळालंच नाही. यामध्येच एक नाव म्हणजे आमिर खानचा भाऊ फैजल खान. वडील ताहिर हुसैन यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आमिर व फैजलने कलाक्षेत्रात पदार्पण केलं. मात्र दुर्देवाने आमिरला बरीच प्रसिद्धी मिळाली. फैजल मात्र प्रसिद्धी आणि चित्रपटांपासून दूर राहिला. काही वर्षांपूर्वी तो पुन्हा चर्चेत आला. यामागचं कारण होतं ते म्हणजे भाऊ आमिर. फैजलने आमिर गंभीर आरोप केले होते. ते ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. (faissal khan allegations against aamir khan)
फैजलने बरेच दावे केले होते. तो आजारी असल्याचं सातत्याने बोललं जात होतं. पण हे सारं म्हणणं त्याने फेटाळून लावलं. फैजल कधी आजारी नव्हता. भाऊ जबरदस्ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचा. त्याचबरोबरीने त्याला औषधं द्यायचा असं फैजलचं म्हणणं होतं. कोर्टात भाऊ आमिर विरोधात त्याने केसही लढवली. आपण मानसिकरित्या ठिक असल्याचं फैजलला सिद्ध करायचं होतं.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम सना खानच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “तिने आजाराशी…”
मानसिकदृष्ट्या फैजल ठिक नसल्याच्या चर्चा होत्या. तो अशाच परिस्थितीत घरातून पळूनही गेला होता. मात्र काही काळ लोटल्यानंतर फैजल पुन्हा घरी परतला. त्यानंतर आमिरवर त्याने गंभीर आरोप केले. जबरदस्ती आजारी म्हणत आमिर औषध देत असल्याचं सातत्याने फैजल म्हणत राहिला. फैजलने २००८मध्ये हिंदुस्तान टाइम्सला मुलाखतही दिली होती. या मुलाखतीदरम्यान त्याने आमिरविषयी बरंच भाष्य केलं होतं. तो म्हणालेला, “मी कधीच आजारी नव्हतो. माझ्याबाबत ज्या चर्चा होत होत्या त्या सगळ्या माझा मोठा भाऊ आमिर आणि कुटुंबातील काही व्यक्तींमुळे झालं. माझ्या आजाराबाबत अनेक गैरसमज झाले”.
फैजल मानसिकदृष्ट्या ठिक असल्याचं निकालामध्ये कोर्टानेही सांगितलं होतं. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीतही फैजलने याबाबत भाष्य केलं होतं. “आमिरने स्वतःच्या घरात मला कोंडून ठेवलं होतं. तो मला सतत ड्रग्ज द्यायचा. एकदा आमिर डॉक्टर आणि पोलिसांना घेऊन माझ्या घरीच आला. तेव्हा ४० बॉडीगार्ड्स काठ्या आणि इतर सामान घेऊन माझ्या इमारतीत घुसले होते”. फैजलने आमिरबरोबर ‘मेला’ चित्रपट केला. दोघांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.





