‘सितारे जमीन पर’ चित्रपटामधून आमिर खानने पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांमध्ये कमबॅक केलं आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर कुठेच दिसला नाही. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची तो तयारी करत होता. अपयशानंतर पुन्हा एकदा नव्याने मेहनत करण्याचा त्याने निश्चय केला. आणि आता त्याला यामध्ये यश मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. आमिरसह जिनिलीया देशमुखचीही मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी (१९ जून) या चित्रपटाचा प्रीमियरही दिमाखात पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार, बॉलिवूडची मंडळी आणि आमिरचे कुटुंबियही उपस्थित होते. (Aamir khan daughter ira khan troll)
‘सितारे जमीन पर’च्या प्रीमियरला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या सगळ्यामध्ये आणखी एका व्यक्तीची जोरदार चर्चा रंगली. आमिरची लेक आयरा खान तिला मराठमोळा पती नुपूर शिखरेसह आली होती. यावेळी आयरा व नुपूरने रेड कार्पेटवर एन्ट्री केली. दरम्यान नुपूरच्या लूकची व फिटनेसची सर्वत्र चर्चा झाली. मात्र आयराचा लूक पाहून अनेकांनी विविध कमेंट केल्या. आयराचं वाढतं वजन आणि तिचा बदलता लूक काही भलताच होता.
आणखी वाचा – आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट नक्की कसा?, प्रेक्षकांनी पाहावा की नाही?, पुन्हा अपयश की…
नुपूरने प्रीमियरसाठी ब्लेजर परिधान केलं होतं. मात्र आयराचा ड्रेसिंग सेन्स नेटकऱ्यांना काही पटला नाही. तिचं वाढतं वजन सोडता ड्रेसिंह सेन्सही खराब असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं. टॉप, पँट आणि त्यावर लाल रंगाचं जॅकेट तिने परिधान केलं होतं. विशेष म्हणजे या ड्रेसवर आयराने शूट घातले होते. सगळं काही मिसमॅच होतं. आयराचा हा लूक कोणालाच पटला नाही.
आणखी वाचा – Video : आमिर खानचा लेक सलमान खानला भेटायला येताच बॉडीगार्डने धक्का मारत बाजूला काढलं अन्…; व्हिडीओ व्हायरल
आयराच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या. अशा वातावरणात वेलवेटचे कपडे कोण परिधान करतं?, अरे देवा हिच्याकडे जरा लक्ष दे, हिचा फॅशन सेन्स काही भलताच आहे, आयरा स्वतःकडे अधिक लक्ष देईल अशी मला आशा आहे, ही अल्लादीनसारखी मला वाटते, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या. तर काहींनी तिची एकता कपूरशीही तुलना केली. आमिरच्या जावयाचं मात्र अनेकांनी तोंडभरुन कौतुक केलं.





