गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 21, 2026 | 12:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Savalyachi Janu Savali Team

'सावळ्याची जणू सावली' मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

Savalyachi Janu Savali Team : ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा प्रवास ज्या पंढरपूरच्या पवित्र भूमीत सुरू झाला, त्याच पंढरपुरात दोन वर्षांनंतर मालिकेने आपल्या यशस्वी प्रवासाचा खास टप्पा साजरा केला. विठ्ठल-रुक्मिणी भक्तांसाठी आणि मालिकेच्या प्रेक्षकांसाठी झी मराठीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर पंढरी’ या भक्तिमय मैफलीच्या माध्यमातून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मालिकेतील सावली (प्राप्ती रेडकर), सारंग (संकेत कामत), अबीर (साईराज केंद्रे) आणि ओवी (वेदांती भोसले) हे कलाकार पारंपरिक वेशभूषेत पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांसोबत भक्तिरंगात रंगून गेले.
सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती रेडकर हिने पंढरपूर वारीचा आपला अनुभव आणि भावना व्यक्त करताना सांगितले “मालिकेत सावलीची भूमिका साकारत असताना मला दोन वेळा वारीला जायचा योग आला आणि त्या आधीही मी एक वर्ष गेले होते. या वर्षी माझं चौथं वर्ष होत. मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते, कारण असं म्हणतात ना, तुमची कितीही उत्कट इच्छा असू दे, तुम्ही कितीही प्रयत्न करा, जोपर्यंत विठुरायाच्या मनात येत नाही, तोपर्यंत तुमच्या दर्शनाचा योग येत नाही.

विठूचं बोलावणं असेल, मगच त्याचं दर्शन मिळतं. मला चार वेळा दर्शन मिळालं म्हणजे मी खरंच खूप भाग्यवान आहे. ही विठुरायाची माझ्यावर असलेली असीम कृपा आहे. माझ्या आई-वडिलांचीही इच्छा आहे की त्यांनाही विठ्ठलरायाचं दर्शन घ्यायचं आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या पहिल्या वर्षाची सुरुवातच आम्ही विठुरायाच्या दर्शनाने केली होती. मागच्या वर्षी आम्ही वारीत चाललो आणि खूप छान दर्शनही घेतलं. त्या वेळी वारीमध्ये आमचं शूटही होतं. मला आधी वाटायचं, मी एवढी कशी चालणार? पण अनुभवाने सांगते, सोबतचे वारकरी खूप गोड आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. स्वतःकडे खायला नसलं तरी दुसऱ्याला आधी खायला देतील. वारीमध्ये शूट सुरू असतानाही पायी चालताना अजिबात थकवा जाणवला नाही. हे बळ विठुरायाच देतो, असं मला वाटतं. एवढं शूट, एवढं चालणं आणि भाविकांची प्रचंड गर्दी असूनही याही वेळेस मला मनसोक्त, डोळे भरून विठ्ठल माऊलींचं दर्शन लाभलं. त्यासाठी मी विठ्ठलाचे मनापासून आभार मानते. इतके आभार की ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

आणखी वाचा – विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा, ‘घबाडकुंड’च्या दिग्दर्शनाने जिंकली मनं

या वर्षी आम्ही शूटसाठी पंढरपुरात जात होतो, पण तिथे शूट होणार की नाही, वारीत सहभागी होणार की नाही, यापैकी काहीच निश्चित नव्हतं. पण माझी एकच इच्छा होती की मला वारीला जायचं आहे. मी सतत विठुरायाला साकडं घालत होते, ‘विठुराया, काहीतरी कर, जेणेकरून मला दर्शन मिळेल.’ त्याच दरम्यान झी मराठीचा आळंदीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यक्रम होता, पण मुसळधार पावसामुळे तो रद्द झाला. तेव्हा मला वाटलं, यंदा कदाचित दर्शन होणार नाही. पण अचानक अवघ्या दोन दिवसांत ‘स्वर पंढरी’ या झी मराठीच्या कार्यक्रमामुळे माझी विठुरायाच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. या कार्यक्रमात वारकरी, पंढरपुरातील गावकरी आणि अंध मुल यांचा सहभाग होता. या कार्यक्रमात केतकी माटेगावकरची गाणी, नृत्य सादरीकरणं आणि अनेक कलाकारांचा सहभाग होता. आमच्या मालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारेही आले होते. अतिशय भव्यदिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम होता. याच निमित्ताने मला विठुरायाचं दर्शन मिळालं आणि या मोठ्या सोहळ्याचा भाग होण्याचं भाग्यही लाभलं. या सगळ्या अनपेक्षित अनुभवामुळे मी खूप आनंदी आहे. माझ्या अनुभवाने सांगते, आषाढीच्या महिन्यात पंढरपूर खूपच अप्रतिम दिसतं. त्या परिसरात एक अलौकिक शक्ती असल्यासारखं वाटतं.

आणखी वाचा – मुला-मुलींना लाठीने मारलं, ओढत नेलं; CJP आंदोलनादरम्यानच्या पोलिसांच्या कारवाईवर कलाकार संतप्त, म्हणाले…

गेल्या वर्षी वारीत दिंडीत आम्ही शूट करत होतो. माझे आई-बाबा हरवले आहेत असा सीन होता. मी आणि सारंग आई-बाबांना शोधत होतो. मी वारकऱ्यांना विचारत होते, ‘माझे आई-बाबा कुणाला दिसले का?’ तेव्हा अनेक वारकरी स्वतःची दिंडी सोडून माझ्या आई-बाबांना शोधायला तयार झाले होते. नंतर आम्ही त्यांना हा शूटचा भाग असल्याचं सांगितलं. तेव्हा जाणवलं की वारकरी किती निर्मळ मनाचे असतात. फॅन मोमेंट सांगायचं झालं तर, शूट सुरू असताना एक काकी माझ्याजवळ आल्या आणि अचानक माझ्या पाया पडल्या. मी त्यांना म्हटलं, ‘काकी, माझ्या पाया पडू नका.’ पण त्या इतक्या प्रेमाने म्हणाल्या, ‘सावली, तुझी भेट झाली आणि तुझ्यातच आम्हाला पंढरी दिसली. आता आम्हाला पंढरीला जायची गरज नाही.’ ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ते ऐकून माझे डोळे भरून आले. आजही तो क्षण आठवला की खूप भावूक व्हायला होतं.”

Tags: marathi serialpandharpur variSavalyachi Janu Savali
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Next Post
Naseeruddin Shah On CJP Protest

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, "गुंडांच्या हातून..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.