शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची तारीख व ठिकाण ठरलं, होणाऱ्या मराठमोळ्या जावयासाठी अभिनेत्याची जय्यत तयारी

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 14, 2023 | 1:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aamir khan daughter ira khan

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची तारीख व ठिकाण ठरलं, होणाऱ्या मराठमोळ्या जावयासाठी अभिनेत्याची जय्यत तयारी

बॉलिवूडमधील स्टारकिड्सच्या यादीमध्ये आमिर खानची लेक आयरा खानचं नावंही आवर्जुन घेतलं जातं. आयरा कलाक्षेत्रापासून दूर असली तरी तिचे सोशल मीडियावर मिलियनच्या घरात फॉलोवर्स आहेत. शिवाय ती सतत चर्चेतही असते. काही महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड नुपुर शिखरेबरोबर तिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. आता आयराच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आयराचं लग्न कधी होणार? कुठे होणार? लग्नाला कोण कोण उपस्थित असणार? याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

आमिर व संपूर्ण खान कुटुंबिय आयराच्या लग्नाच्या तयारी लागलं आहे. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, उदयपुरमध्ये आयरा-नुपुरचं लग्न होणार आहे. जवळपास तीन दिवस आयराच्या लग्नाचे कार्यक्रम असतील. लग्नामध्ये कुटुंबिय तसेच जवळची मित्र-मंडळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अगदी कमी लोकांच्या उपस्थित हे लग्न होणार आहे. कलाक्षेत्रामधील मंडळीही या विवाहसोहळ्याला उपस्थित नसणार असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेतील भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पाहून अभिनेत्रीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “बापरे! तुला खरंच…”

शिवाय आमिरही लेकीच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आमिर लेकीच्या विवाहसोहळ्यासाठी विविध प्लॅनिंग करत आहे. तसेच तो स्वतः प्रत्येक तयारीमध्ये लक्ष देत आहे. होणाऱ्या जावयाचं स्वागत करण्यास आमिर सज्ज झाला आहे. लेकीच्या साखरपुड्यामध्येही आमिर अगदी आनंदी होता. त्याच्या नृत्याने तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

आणखी वाचा – “पाटील म्हणतो नाव घे बाई…”, भर कार्यक्रमात नम्रता संभेरावचा नवऱ्यासाठी खास उखाणा, म्हणाली, “योगेशराव बसले पुजेला आणि…”

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

नुपुर एक फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींना तो ट्रेन करतो. शिवाय आमिरचाही तो फिटनेस ट्रेनर होता. दरम्यान आयरालाही ट्रेन करत असताना दोघांमध्ये मैत्री झाली. आयरा-नुपुरच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आयरा आमिरची पहिली पत्नी रिना दत्ताची मुलगी आहे. आता आयराच्या लग्नानिमित्त संपूर्ण खान कुटुंबिय पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.

Tags: aamir khanbollywood actorbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Hemangi Kavi New Post

नवऱ्याचे कपडे परिधान करुन घराबाहेर पडली हेमांगी कवी, फोटो पोस्ट करत म्हणाली, "भारीतला शर्ट ढापून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.