शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आमिर खानच्या लेकीच्या लग्नात दोन मराठमोळ्या कलाकारांचीच हवा, वरातीमध्ये नाचले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 4, 2024 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nupur Shikhare and Ira Khan Marriage

आमिर खानच्या लेकीच्या लग्नात दोन मराठमोळ्या कलाकारांचीच हवा, वरातीमध्ये नाचले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

Nupur Shikhare and Ira Khan Marriage : अभिनेता आमिर खानच्या लेकीचा म्हणजेच आयरा खानच्या लेकीचा ३ जानेवारी रोजी शाही विवाहसोहळा संपन्न झाला. आयराने नुपूर शिखरेसह सप्तपदी घेत लगीनगाठ बांधली. आमिरच्या लेकीच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आमिर खानची लेक आयरा खान सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आयरा खान व नुपूर शिखरेच्या शाही लग्नसोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आयरा व नुपूर यांच्या लग्नाआधीचे कार्यक्रमही अतिशय उत्साहात साजरे होताना दिसले. नूपुरच्या हळदी समारंभासाठी आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी किरण राव व रीना दत्ता यांची उपस्थिती होती. आमिर खानच्या लेकीच्या लग्नासाठीही त्यांच्या दोन्ही पत्नींनी विशेष सहभाग घेत एन्जॉय केलेलं पाहायला मिळत आहे. आयरा व नूपुरच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. दोघांच्या रिसेप्शन लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – नवरी नटली पण आमिर खानच्या जावयाने जिमच्याच कपड्यांमध्ये केलं लग्न, अनेक पाहुणेही होते उपस्थित, खास लूकची सोशल मीडियावर चर्चा

आयरा व नूपुरच्या लग्नाला मराठी कलाकारांची मांदियाळी ही पाहायला मिळाली. नुपूर व आयराचा मित्रपरिवार म्हणजेच मिथिला पालकर, सिद्धार्थ मेनन, सारंग साठ्ये व त्याची पत्नी पॉला मॅकग्लेन यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. दोघांच्या लग्नाला या कलाकार मंडळींनी धमाल मस्ती केलेली पाहायला मिळत आहे. लग्नाआधीही मिथिला पालकर व इतर मित्रपरिवाराने आयरा व नुपूर यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने केळवण साजरं केलं.

आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीची कमाई किती?, वर्षभरात कमावते इतके कोटी, स्वत:ची प्रॉपर्टी आहे अन्…

गेले दोन दिवस आयरा व नुपूर यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी मराठमोळ्या व महाराष्ट्रीयन पद्धतीने या विधी पार पडल्या. अशातच काल (3 जानेवारी) रोजी दोघांचे नोंदणी पद्धतीने लग्न पार पडले आहे. त्यांच्या आयरा खानने लग्नात धोती चोली ड्रेस परिधान केला होता. तर नुपूर मात्र त्याच्या लग्नात बनियान व शॉट्सवर असल्याचे पाहायला मिळाले. लग्नात आयरा-नुपूर यांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळे हे दोघेदेखील चांगलेच चर्चेत आले आहेत.

Tags: aamir khanentertainmentira khanIra khan and nupur Shikhare Weddingmithila palkarnupur shikhare
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
aamir khan kissed to ex wife kiran rao front of all at daughter iras wedding reception

Video : …अन् आमिर खानने पूर्वाश्रमीच्या पत्नीला सगळ्यांसमोर केलं किस, लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यामधील 'तो' व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.