मनोरंजन विश्वात सध्या आघाडीची मालिका म्हणजे आई कुठे काय करते नव्या विषयासह छोट्या पडद्यावर अवतरलेली मालिका दीर्घ काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. मालिकेतील अरुंधती या पात्रा भोवती फिरताना दिसतंय. एका लग्नानंतर महिलांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे का नाही या घटनांवर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. (Aai Kuthe Kay Karte update)

अनिरुद्ध सोबत मोडलेल्या लग्नानंतर अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोष हा नवीन साथीदार म्हणून आला. आता काहीही संबंध नसताना देखील अनिरुद्धला अरुंधती आणि आशुतोषच हे प्रेम मान्य नाही.सगळ्या अडचणी पार करत अरुंधती आणि अनिरुद्धच प्रेम आता लग्नाच्या मुहूर्त पर्यंत पोहचलं आहे.
मेहंदी, हळद असे लग्नाचे सारे विधी आता पार पडले असून लवकरच अरुंधती आणि आशुतोष विवाह बंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. एवढच काय तर कालाच्या भागात आशुतोष आणि अरुंधती हनीमून साठी कुठे जाणार हे है ठरल्याचं दिसून येत आहे. आशुतोष आणि अरुंधतीचा मित्र आशुतोषला हनीमून पॅकेज गिफ्ट करत तू आता अरुंधती सोबत इथे जा सांगतो. सुरुवातीला आशुतोष अरुंधतीला हे आवडणार नाही म्हणून टाळतो पण नंतर स्वतःही तयार होतो.(Aai Kuthe Kay Karte update)
====
हे देखील वाचा – या अभिनेत्रीला ओळखलंत का?, सध्या गाजवते छोटा पडदा
====
अरुंधतीच्या या निर्णयाच सर्वांनी कौतुक केल असलं तरीही कांचन आई, अनिरुद्ध यांनी या गोष्टीला तीव्र विरोध केलेला दिसतोय. अनिरुद्धच्या प्रत्येक डाव उधळून लावण्यात घरातल्यां सोबतच संजना हि अरुंधतीला मदत करताना दिसत आहे. तेर आता मालिकेत कोणतं नवीन वळण येणार? अरुंधतीच लग्न निर्विघनपणे पार पडणारे का ? हे पाहणं रंजक ठरणार आहे.