शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रिटायर झालो होतो पण…”, ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचे स्वत:च्या भूमिकेविषयी भाष्य, म्हणाले, “काही महीने घरी…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 8, 2024 | 1:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aai Kuthe Kay Karte marathi serial fame actor Milind Gawli said that this role came to me when I was thinking of retirement

आई कुठे काय करते मालिका फेम मिलिंद गवळी यांनी मी रिटायरमेंटचा विचार करत असताना ही भूमिका माझ्याकडे आली असं म्हटलं आहे.

मराठी मालिकाविश्वातीत लोकप्रियतेचं शिखर गाठवणाऱ्या मालिकांपैकी एक ‘आई कुठे काय करते’ मालिका आहे. लवकरच ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.  पाच वर्षांच्या या प्रवासात देखमुख कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झाली. रसिक प्रेक्षकांनीही देशमुख कुटुंबातले सुखाचे क्षण आपले मानून आनंद व्यक्त केला. पण ज्याची सुरुवात होते त्याचा शेवटही ठरलेला असतोच. भरभरुन प्रेम मिळाल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. (Milind Gawli On Aai Kuthe Kay Karte)

गेल्या काही महिन्यांपासून मालिकेतील सातत्याने बदलणारे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड रंटाळवाणे वाटले. त्यामुळे प्रेक्षक ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद करण्याची मागणी करत होते. अशातच काही महिन्यांपूर्वी मालिकेची वेळ बदलण्यात आली. दुपारी २.३० वाजताची वेळ ‘आई कुठे काय करते’ मालिकेला देण्यात आली. पण, आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून मालिका बंद होणार असल्याचं जाहीर केलं. अशातच त्यांनी मी रिटायरमेंटचा विचार करत असताना ही भूमिका माझ्याकडे आली असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “हिंमत असेल तर…”, गेल्या २० दिवसांत सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून पाचवी धमकी, म्हणाले, “गाणं लिहिणाऱ्याला…”

मालिकेच्या निरोपानिमित्त इट्स मज्जाने अनिरुद्ध फेम अभिनेते मिळणद गवळी यांच्याशी खास संवाद साधला. तेव्हा आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलं की, “बऱ्याच वर्षांपूर्वी मी रिटायर झालो होतो. ज्यावेळी हीरो म्हणून मला कामे मिळतील असं वाटत नव्हतं. काही महीने घरी बसलो होतो आणि मालिका मी कधीच करत नव्हतो. मला करायच्या नव्हत्या. कारण पडद्यावर आपण फार लोकप्रिय राहणार नाही असं मला वाटत होतं. मग शशांक सोळंकीने मला ‘तू अशी जवळी रहा’ आणि ‘सारे तुझ्यासाठी’ अशा मालिकांमध्ये काम दिले. या मालिकेनंतर मला ‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी बोलवण्यात आले.

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : लीलाच्या हट्टामुळे एजे साजरी करणार दिवाळी, अंतरानंतर पहिल्यांदाच होणार पाडवा, दोघांचे नातं फुलणार

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “त्यानंतर मग या मालिकेतील भूमिकेबद्दल मला सांगण्यात आले. मालिकेतील अनिरुद्ध या पात्राचे नेमकं काम काय? हे सगळं सांगण्यात आले. मग हळूहळू या पात्राचे कंगोरे समोर आले. काही वेळेस अनिरुद्धचा राग यायचा, कधी त्याची माया वाटायची. कधी त्याला शिव्या द्यायचे. असं करत करत मालिकेला आणि अनिरुद्ध या पात्राला एकूण पाच वर्षे कशी झाली कळलच नाही”.

Tags: Aai Kuthe Kay Karte Fame AnirudhAai Kuthe Kay Karte serial Marathi newsMilind Gawli On Aai Kuthe Kay Karte
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
deepika padukone daughter latest photos

आई झाल्यानंतर लेकीसह पहिल्यांदाच दिसली दीपिका पदुकोण, मुलीच्या गोड फोटोंनी वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.