आई कुठे काय करते या मालिकेने अनेक नवीन मालिकांच्या शर्यतीत स्वतःच स्थान टिकवून ठेवलं आहे.अनेक रंजक वळणांमुळे मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. सध्या वीणाच्या येण्याने अनेक गोष्टी मालिकेत घडत आहेत. वीणाचा वापर करून अनिरुद्ध नक्की काय नवीन खेळी खेळणार आहे. याची उत्सुकता सध्या पाहायला मिळते.(Akkk Episode Update)
अनिरुद्ध सध्या वीणाच्या मनात संजना बदल गैरसमज निर्माण करत आहे. अरुंधती,नितीन, आशुतोष सर्वचजण वीणाला सावध करण्याचं प्रयत्न करत आहेत, परंतु तिचा सध्या अनिरुद्धवर खूप विश्वास आहे. वीणाच्या मनात सतत एक भीती पाहायला मिळते. तिच्या भूतकाळात नक्की असं काय घडलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न संपूर्ण केळकर कुटुंब करत आहे.
पाहा काय घडणार आजच्या भागात? (Akkk Episode Update)
आजच्या भागात आपण पाहणार आहोत, देशमुखांकडे सगळे बसलेले असतात, तेव्हा निखिल जानकी सोबत खेळण्याचा हट्ट करत असतो,या गोष्टीमुळे अनिरुद्ध निखिल वर खूप चिडतो.तितक्यात कांचन आई देव दर्शनावरून परत येतात, त्यांच्या परत येण्याने सगळेच खूप खुश असतात, परंतु तेव्हा कांचन आई पुन्हा यशच्या लग्नाचा विषय काढते आणि यश तिकडून निघून जातो.
अरुंधती पूजाची तिच्या नवऱ्याच्या तावडीतून सुटका करते, तिच्या नवऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देते. परंतु हा सगळा प्रकार घडल्यानंतर अरुंधतीच्या लक्षात येत की विना तिच्या सोबत होती ती आता तिकडे नाहीय. अरुंधती वीणाला शोधण्याचा प्रयत्न करते, तेव्हा एका माणसाने विणला पाहिलेलं असत, तेव्हा अरुंधतीच्या लक्षात येत की वीणा बहुतेक परस्पर घरी गेली आहे.तर पुढील भागात अरुंधती आणि वीणा घरी असतात, तेव्हा वीणा खूप रडत असते आणि ती खूप घाबरलेल्या अवस्थेत असते, तेव्हा ती अरुंधतीला म्हणते,की मला वाटलं होत आपल्या घरात तरी मी सुरक्षित असेन पण तस नाहीय, त्यावर अरुंधती तिला विचारते तुला कोण त्रास देत आहे? तेव्हा वीणा तिला म्हणते, माझा नवरा अमन मला त्रास देतो आहे. नक्की वीणाच्या भूतकाळात काय घडलं आहे, अमनची एन्ट्री मालिकेत होणार का? हे पात्र कोण साकारेल हे बघणं रंजक ठरणार आहे.(Akkk Episode Update)