मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मधुराणी प्रभुलकरची लेकही नाटक बसवणार, अभिनेत्रीनेच सांगितला प्लॅन, म्हणाली, “माझ्यापेक्षा माझी मुलगी…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 12, 2023 | 6:53 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Madhurani Prabhulkar Ganeshotsav

मधुराणी प्रभुलकरची लेकही नाटक बसवणार, अभिनेत्रीनेच सांगितला प्लॅन, म्हणाली, "माझ्यापेक्षा माझी मुलगी…"

यंदाच्या गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस उरले आहेत. त्यानिमित्ताने सर्वत्र तयारीला सुरुवात झाली आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सगळेच आतुर झालेले असून मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारदेखील गणेशोत्सवाच्या तयारीला लागली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरही बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज असून तिच्या कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवाची विशेष तयारी केली आहे. (Madhurani Prabhulkar Ganeshotsav)

दरम्यान, छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील शूटमुळे मधुराणी प्रभुलकर ही मुंबईत राहत असली, तरी तिची मुलगी तिच्या कुटुंबीयांबरोबर पुण्यात राहते. त्यावेळी तिच्या मुलीला शक्य होईल, तितका वेळ देण्याचा प्रयत्न ती करत असते. असं असलं, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या मुलीबद्दलचं प्रेम अनेकदा व्यक्त करत असते. मधुराणीच्या घरी यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून यानिमित्त तिच्या मुलीने एक नाटक बसवलं असल्याचं तिने ‘इट्स मज्जा’ला सांगितलं आहे.

हे देखील वाचा – Video : एव्हरग्रीन नारकर कपलचा तरुणांना लाजवणारा फिटनेस व्हिडीओ, नेटकरीही करत आहेत कौतुक

‘स्टार प्रवाह’च्या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात अरुंधती म्हणजेच मधुराणीने हजेरी लावली होती. त्यानिमित्ताने तिने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला होता. त्यावेळी तिच्या मुलीच्या नाटकाविषयी बोलताना म्हणाली, “मी यंदाच्या गणेशोत्सवासाठी अजून काही ठरवलेलं नाही. पण माझ्यापेक्षा माझी मुलगी जास्त उत्सुक आहे. तिला सगळे सण साजरे करायला खूप आवडतात. यावर्षी तिने गणपतीसाठी एक नाटक बसवायला घेतलं आहे. मी जेव्हा पुण्यात जाते तेव्हा त्या नाटकातील संवाद ती मला म्हणून दाखवते, ते कसं बसवायचं हे ती मला विचारत असते. त्यामुळे तिचा उत्साह हाच माझा उत्साह आहे.”, असे मधुराणी म्हणाली आहे.

हे देखील वाचा – “ताईमध्ये आई दिसते”, हर्षदा खानविलकरबरोबरच्या भेटीनंतर ‘बिग बॉस’ फेम उत्कर्ष शिंदेची पोस्ट, म्हणाला, “जिच्या पायाला…”

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या मालिकेने अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला वेगळी ओळख मिळवून तर दिलीच, शिवाय तिचा चाहतावर्ग ही प्रचंड वाढला आहे. मधुराणी अभिनयाबरोबर उत्कृष्ट गायिका व कवयित्रीदेखील आहे. विशेष म्हणजे, आपल्या आईप्रमाणे मधुराणीची मुलगीदेखील तितकीच खूप टॅलेंटेड आहे. याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा दिसून आला आहे.

Tags: aai kute kay kartearundhatimadhurani prabhulkarstar pravah ganeshotsav 2023
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
transgender gauri sawant

भिक मागून आणलेल्या पैशांचं तृतीयपंथी पुढे काय करतात? गौरी सावंत यांनी उघड केलं सत्य, म्हणाल्या, “ते पैसे...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.