सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“७ वर्षांची चिमुरडी तरीही…”, ‘आई कुठे…’मध्ये काम करत असलेल्या मुलीला पाहून अरुंधती भारावली, म्हणाली, “तिचा आदर वाटतो कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 24, 2024 | 4:31 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Aai kuthe kay karte fame Arundhati aka Madhurani Prabhulkar shared special appreciation post for the serial's child artist Janhavi

"७ वर्षांची चिमुरडी तरीही...", 'आई कुठे...'मध्ये काम करत असलेल्या मुलीला पाहून अरुंधती भारावली, म्हणाली, "तिचा आदर वाटतो कारण..."

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आला आहे. मालिकेतील कथानकेत होत जाणारे बदल तसेच कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ही मालिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेतील अरुंधती या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. अशातच या मालिकेतील जान्हवी या पात्राचेहे कौतुक होत आहे.

मालिकेत जान्हवी हे पात्र साकारणारी बालकलाकार मनू ही चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. प्रेक्षक तिच्या अभिनयाचे कौतुक करत असतानाचं स्वत: अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरदेखील तिच्या अभिनयाने भारावली आहे. त्यामुळे अभिनेत्रीने जान्हवीसाठी खास पोस्ट शेकर केली आहे. मधुराणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे जान्हवीबरोबरचे खास फोटो शेअर करत असे म्हटले आहे की, “मनू , अर्थात जान्हवी…काय सुंदर काम करते . आणि रोज आम्हाला थक्क करत असते. जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी. ह्या वयात तिचा तिच्या कामावर असणारं लक्ष, निष्ठा ,प्रेम, संयम, चिकाटी हे सगळं अवाक करणारं आहे.”

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’च्या टॉप ३ स्पर्धकांची नावं समोर, कोण ठरणार विजेता?, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी नुसतं तिला बघूनच तिच्याकडून किती गोष्टी रोज शिकत असते. मला तिचं कौतुक वाटतंच पण खरं सांगायचं तर तिच्याप्रती एक प्रकारचा आदरही वाटतो. आणि ते वाटणं अतिशय गोड वाटतं. त्यामुळे ही गोड मुलगी आई कुठे काय करते मालिकेच्या टीममध्ये असणे हे आमचं भाग्य आहे.”

आणखी वाचा – “लग्नानंतर माझ्या सासरवाडीमध्ये…”, मकरंद अनासपुरेंनी सांगितली त्यांची लव्हस्टोरी, म्हणाले, “चाळीत राहत असताना…”

दरम्यान, या पोस्टवर अनेक चाहत्यांनीही “जान्हवी अत्यंत प्रतिभावान बालकलाकार आहे, तिचा दमदार अभिनय नेहमीच अवाक करतो. तुम्ही सगले तिला खूप सांभाळून घेता यासाठी धन्यवाद, ती खूप छान काम करते” अशा अनेक कमेंट्स करत त्या बालकलाकाराचे कौतुक केले आहे.

Tags: मनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी मालिकाआई कुठे काय करतेaai kuthe kay karteentertainment newsmadhurani prabhulkarmarathi actressmarathi entertainmentMarathi entertainment news मधुराणी प्रभूलकरmarathi serial
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

"तिने माझ्या बहिणीचे कपडे घातले अन्…", अंकिता लोखंडेवर मन्नारा चोप्राच्या बहिणीचे गंभीर आरोप, म्हणाली, "तू खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.