सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिने माझ्या बहिणीचे कपडे घातले अन्…”, अंकिता लोखंडेवर मन्नारा चोप्राच्या बहिणीचे गंभीर आरोप, म्हणाली, “तू खूप…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 24, 2024 | 5:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

"तिने माझ्या बहिणीचे कपडे घातले अन्…", अंकिता लोखंडेवर मन्नारा चोप्राच्या बहिणीचे गंभीर आरोप, म्हणाली, "तू खूप…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस’च्या १७व्या सीझनचा विजेता लवकरच समोर येणार आहे. या शोचा फिनाले जवळ आला असून या कार्यक्रमाचे टॉप पाच स्पर्धक समोर आले आहेत. अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार व मुन्नवर फारुकी यांनी ‘बिग बॉस’च्या टॉप पाच स्पर्धकांच्या यादीत आपलं स्थान कमावलं आहे. मन्नारा व अंकिता यांच्यात ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अनेकदा भांडण झालेलं पाहायला मिळालं.

अलीकडेच ‘बिग बॉस’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान अंकिता लोखंडे मन्नारा चोप्रावर रागावताना दिसली. अंकिताने त्या दिवशी मन्नाराची साडी नेसली होती, यावरुन अभिनेत्रीच्या बहिणीने म्हणजेच मिताली हांडाने अंकिताची कानउघडणी केली आहे. मिताली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिची बहीण मन्नाराला खूप सपोर्ट करत आहे. मिताली हांडा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती अंकितावर राग व्यक्त करताना दिसली आहे.

आणखी वाचा – “७ वर्षांची चिमुरडी तरीही…”, ‘आई कुठे…’मध्ये काम करत असलेल्या मुलीला पाहून अरुंधती भारावली, म्हणाली, “तिचा आदर वाटतो कारण…”

मितालीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अंकिता लोखंडेचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती साडी नेसलेली दिसत आहे. या फोटोवर मितालीने लिहिलं आहे की, “अंकिता लोखंडेने मन्नाराकडून घेतलेले कपडे परिधान केले होते. जे मी माझ्या बहिणीसाठी पाठवले होते. मन्नारा एक दयाळू मुलगी आहे, ती इतरांना कपडे देखील देते. म्हणूनच मीडियाला तिचा आदर आहे. पण इथे अंकिता मन्नाराच्या विरोधात बोलताना दिसली. अंकिता तुला सलाम, तू खूप असंवेदनशील आहेस” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली होती.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’च्या टॉप ३ स्पर्धकांची नावं समोर, कोण ठरणार विजेता?, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

अंकिताने पत्रकार परिषदेनंतर मन्नाराची माफी मागितली. तिने मन्नाराशी बोलून सगळं क्लिअर केलं होतं. विकी व मन्नारा यांचं बिग बॉसच्या घरातील बॉण्डिंग चांगलं होतं. दरम्यान, विकीला बाहेर काढल्यानंतर मन्नारा अंकिताची काळजी घेताना दिसली. मन्नाराच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिला मतदान करुन पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे. मन्नाराची चुलत बहीण प्रियांका चोप्रा देखील तिच्या समर्थनार्थ पुढे आलेली पाहायला मिळाली.

Tags: ankita lokhandeankita lokhande and mannara chopra fightbigg boss 17entertainmentmannara chopramitali handa
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Actress Hruta Durgule shared special post about people who gossip

"जे माझ्याबद्दल गॉसिप करतात...", ऋता दुर्गुळेचा निशाणा नक्की कोणाकडे?, पोस्ट शेअर करत म्हणाली, "माझ्या आयुष्याचा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.