आई कुठे काय करते ही मालिका अनेक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.या मालिकेने देखील टीआरपी मध्ये सुरावतीपासूनच पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्वतःच स्थान टिकवून ठेवलं आहे.कलाकारांच्या अभिनयातील सहजता हा या मालिकेचा भक्कम पाया आहे असं नक्कीच म्हणता येईल.(Nitin Expose Anirudh)
मालिकेमध्ये वीणाची एन्ट्री झाल्या पासून मालिका एका वेगळा वळणावर असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. अनिरुद्ध च्या वागण्याचा त्याच्या डोक्यात नक्की काय शिजतंय हा अंदाज अजूनही कोणाला लावता येत नाही आहे. वीणा त्याच्या जाळ्यात अडकणार की तीच अनिरुद्धसाठी जाळ ठरणार हा एक प्रश्नच आहे.
पाहा काय घडलं आजच्या भागात? (Nitin Expose Anirudh)
आजच्या भागात अभि खूप टेन्शन मध्ये असतो,कारण त्याच्या चुकीमुळे एका पेशंटची प्रकृती गंभीर असते. तर ऑफिसमध्ये विना आणि अनिरुद्ध त्यांच्या प्रेजेंटेशनची तयारी करत असतात, तेव्हा अरुंधती नितीन आणि आशुतोष तिकडे येतात. तेव्हा नितीन अनिरुद्धला विचारतो की कंपनीच्या अकाउंट मधून ५० लाख रुपये काढले आहेत या बदल विनाला माहित आहे का? आणि या पैश्यांचा हिशोब आहे का?(Nitin Expose Anirudh)

त्यावर विना अनिरुद्धची बाजू घेते, आणि म्हणते कि मला हे सगळं माहित आहे, अनिरुद्धने नवीन ऑफिसच्या जागेसाठी हे पैसे घेतले आहेत,त्यानंतर विना समोर चांगलं इम्प्रेशन होण्यासाठी अनिरुद्ध आशोतोषला प्रेझेन्टेशन दयायला सांगतो कारण त्याने त्यामध्ये बदल केलेले असतात, अनिरुद्धच्या या निर्णयामुळे विना खुश होते.तर ज्यांच्या सोबत प्रेझेन्टेशन असत ते अरुंधती आणि आशुतोषचे चाहते असतात.आणि ते अनिरुद्धला त्याचा फोटो काढायला सांगतो.
हे देखील वाचा : उदयच्या शर्टला लागली आग,हसून सगळे लोटपोट- ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ मालिकेचा BTS