स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलंस वाटतं.गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत येणाऱ्या ट्वीस्टमुळे ही मालिका कित्येक आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. सध्या या मालिकेत आईचं म्हणजेच अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घालण्यात आलाय. या लग्नाची लगभघ मालिकेत पाहायला मिळतेय.पण या कथानकावरूनवरून सध्या मालिका ट्रोल देखील होते, यावर या मालिकेतील अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हीने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.(Madhurani Prabhulkar)
आई हा विषय केंद्रस्थानी असलेल्या या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील आई म्हणजेच अरुंधती तिच्या प्रेमळ स्वभावामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या अरुंधतीने स्वतःसाठी उचलेलं पाऊल म्हणजे तिचं दुसरं लग्न . तिच्या या निर्णयामुळे सगळेजण चकित झालेत. पण अखेर तिचं लग्न होतंय. तिचं हे दुसरं लग्न हा विषय सध्या सोशल मीडियावरही रंगताना दिसतोय. यावरून तिला अनेकदा ट्रोलदेखील केलं जातंय. तर या ट्रोलर्सना तिने उत्तर देत सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली.

====
हे देखील वाचा- “सर्व भावनांचा कोलाज…” समीरची सचिन गोस्वामींसाठी खास पोस्ट
====
अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ती सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर स्वतःचे मत बिधास्तपणे मांडते, तर तिने मालिकेतील लग्नातील काही फोटोंचा कोलाज असलेला व्हिडीओ शेअर केला. आणि अरुंधतीच लग्न असं म्हणत तिने दुसऱ्या लग्नासंबंधीत पोस्ट केली.(Madhurani Prabhulkar)
काय म्हणाली अरुंधती ?
“अरुंधतीचं लग्न….हे व्हावं की नाही… ? ह्या वयात लग्न करावं का…? केलं तर ते इतकं साजरं करावं का ? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली, होतेय. अनेकांना ह्यात आनंद होतोय तर काही जणांना मान्य होत नाहीये.पण मला नक्की असं वाटतं की , कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का ? लग्न आहे ते… साजरं करावं.हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाह चे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णीचे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर ह्यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.”, अशी पोस्ट मधुराणी प्रभूलकरने केली आहे.तर तिच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी सहमती दर्शवली आहे.