शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईच्या मृत्यूनंतर भारत गणेशपुरे यांचा धाडसी निर्णय; सर्व स्तरातून होतंय कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 10, 2023 | 5:58 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
bharat ganeshpure mother death

bharat ganeshpure mother death

हास्यविर भारत गणेशपुरे यांच्या मातोश्री मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे (८३) याचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी रहाटगाव येथे त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. सायंकाळी त्यांच्या मूळ गावी रहाटगाव येथेच त्यांचे अंत्यविधी करण्यात आले. आईच्या निधनाची बातमी कळताच भारत गणेशपुरे तात्काळ मुंबईहून कुटुंबासह अमरावतीला गेले आहेत. भारत गणेशपुरे यांचे भाऊ मनीष गणेशपुरे यांच्या घरी त्यांच्या मातोश्रींच्या अखेरचा श्वास घेतला.(bharat ganeshpure mother death)

photo credit : google

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते भारत गणेशपुरे मूळचे अमरावतीचेच आहेत. त्यांच्यातल्या कलेला वाव देण्यासाठी त्यांनी मुंबईत त्यांचा पुढचा प्रवास सुरु केला. गणेशपुरे कुटुंबियांना शुभेच्छा देणारा एक फोटो मात्र सध्या व्हायरल होतोय. या फोटोत ‘दिशा इंटरनॅशल आय बँके’च्‍या अधिकाऱ्यांसोबत गणेशपुरे कुटुंबीय दिसत आहेत. गणेशपुरे यांच्या आई मनोरमाबाई यांचे नेत्रदान करण्यात आले आहे. सूत्रांनुसार मनोरमाबाई यांचे नेत्रदान करण्‍यास दिशा ग्रूपचे सचिव स्‍वप्निल गावंडे आणि मुंबई येथील दिग्‍दर्शक विराग वानखडे यांनी प्रेरित केले आहे.

वाचा गणेशपुरे कुटुंबीयांचा धाडसी निर्णय – (bharat ganeshpure mother death)

गणेशपुरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असे असताना गरजूंना या रंगीन जगाची सफर घडवून देण्याच्या उद्दात्त हेतूने गणेशपुरे कुटुंबीयांनी नेत्रदानास संमती दिली. संमती दिल्‍यानंतर ‘दिशा इंटरनॅशल आय बँके’च्‍या चमूने मनीष गणेशपुरे यांच्‍या निवासस्‍थानी पोहचून नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान तेथे ‘दिशा ग्रूप’चे सचिव स्‍वप्निल गावंडे, डॉ. मनीष तोटे, हिमांशू बंड, अंकुश आंबेडकर यांची उपस्थिती होती. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्‍याबद्दल ‘दिशा इंटरनॅशनल आय बँके’च्‍या अध्‍यक्ष कुंदा अरूण गावंडे, स्‍वप्निल गावंडे यांनी गणेशपुरे कुटुंबीयांचे आभारही मानले.(bharat ganeshpure mother death)

====

हे देखील वाचा – ‘त्याने स्वीकारलं नाही तर तुझ्या होणाऱ्या बाळाला माझं नाव दे’ मैत्रिणीसाठी सतीश यांनी उचललेलं मोठं पाऊल

====

गणेशपुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी उचलेल हे मोठं पाऊल नक्कीच दाद देण्यासारखं आहे. आजकाल या दुनियेत असा विचार करणारी लोक फार कमी पाहायला भेटतात. गणेशपुरे यांच्या आई मनोरमाबाई गणेशपुरे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Tags: bharat ganeshpurechala hawa yeu dyacomedianits majjamarathi actorzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Ajinkya Raut New Movie

५ मे पासून बरसणार प्रेमाच्या 'सरी'
अभिनेता अजिंक्य राऊतची नव्या चित्रपटाची घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.