Aadesh Bandekar Father Birthday : ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून “दार उघड बये दार उघड” असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले अभिनेते, निवेदक म्हणजे आदेश बांदेकर. आदेश बांदेकर हे मनोरंजन क्षेत्रासह राजकारणातही तितकेच सक्रिय आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. सध्या या कार्यक्रमाने ब्रेक घेतला आहे. असं असलं तरी आदेश बांदेकर त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. आदेश बांदेकर त्यांच्या सोशल मीडियावरुन नेहमीच काही ना काही शेअर करत संपर्कात राहतात. सोशल मीडियावर त्यांचा बऱ्यापैकी वावर आहे.
सोशल मीडियावर ते नेहमीच त्यांच्या कुटुंबाबरोबरचे अनेक व्हिडीओ, पोस्ट शेअर करतात. आदेश यांच्या पत्नी सुचित्रा आणि मुलगा सोहम दोघेही सिनेविश्वात सक्रिय आहेत. आजवर आदेश यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर घालवलेल्या वेळेबाबत नेहमीच पोस्ट शेअर केल्या आहेत. यानंतर आता आदेश यांनी शेअर केलेली आणखी एक पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. ही पोस्ट आदेश यांनी त्यांच्या वडिलांसाठी केली आहे. आदेश यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट शेअर केली आहे.
आदेश यांनी त्यांच्या वडिलांचा खास व्हिडीओ शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये आदेश यांचे ९३ वर्षीय त्यांचे वडिल वॉक करत आहेत. चंद्रकांत यशवंत बांदेकर. माझे पप्पा. २० फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस. ९३ व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं आहे. आध्यात्मिक संस्कारात वाढलेले. खडतर आयुष्य साकारात्मक दृष्टिकोनातून आनंदमय कसं करायचं हे शिकवणारे आमच्या कुटुंबाचं गुरुकुल. वाढदिवसाच्या शुभेच्छांसह सुदृढ दिर्घायुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना”, असं कॅप्शन देत त्यांनी हा वडिलांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
आदेश बांदेकरांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सीमा घोगले, सुकन्या मोने, सोहम बांदेकर या कलाकार मंडळींनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.