Chhaava Box Office Collection : विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रचंड कमाई करत आहे आणि नवीन विक्रम गाठत आहे. २०२५ सालचा सर्वात मोठा चित्रपट ठरलेल्या ‘छावा’ने त्याच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजे पहिल्या बुधवारी किती कमाई केली याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून इतके प्रेम मिळत आहे की निर्मातेही ते पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे २०२५ मध्ये अक्षय कुमारच्या स्काय फोर्स ही प्रदर्शित झाला आहे परंतु ‘छावा’ सारखा कोणताही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही.
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आणि आठवड्याच्या शेवटीही त्याने चांगली कमाई केली. आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसात चित्रपटांच्या कमाईत सामान्यतः घट होत असली तरी, सोमवारी ‘छावा’ चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली परंतु मंगळवारी पुन्हा एकदा त्यात वाढ दिसून आली, ज्यामुळे व्यापार तज्ञांनाही आश्चर्य वाटले. सध्या हा चित्रपट प्रचंड नफा कमवत आहे. या सगळ्यामध्ये, जर आपण ‘छावा’ च्या कमाईबद्दल बोललो तर सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ ने ३१ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली.
आणखी वाचा – “माझं आयुष्यच बदललं”, रायगडावर पोहोचल्यानंतर विकी कौशल भावुक, म्हणाला, “माझं स्वप्न होतं…”
दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३७ कोटी रुपये कमावले. तर ‘छावा’ने तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटींची कमाई केली. तर चौथ्या दिवशी विकी कौशल स्टारर चित्रपटाने २४ कोटी रुपये कमावले. ‘छावा’ने रिलीजच्या पाचव्या दिवशी २५.२५ कोटी रुपये कमावले आहेत. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘छावा’ने रिलीजच्या सहाव्या दिवशी ३२ कोटींची कमाई केली आहे. यासह, ‘छावा’ने रिलीजच्या सहा दिवसांत १९७.७५ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
आणखी वाचा – दोन जिवांची अनोखी कथा उलगडणार ‘गौरीशंकर’ चित्रपटातून, ट्रेलरने वाढविली उत्सुकता
‘छावा’ने रिलीजच्या सहाव्या दिवशी आपला कलेक्शन वाढवून आणि ३२ कोटी रुपये कमावून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले. यासह, विकी कौशलच्या चित्रपटाने सहाव्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत ‘पठाण’, ‘जवान’, ‘अॅनिमल’, ‘स्त्री २’ आणि ‘बाहुबली २’यासह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. सहाव्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट म्हणजे ‘पुष्पा २’. ‘पुष्पा २’ ने सहाव्या दिवशी ३६ कोटींची कमाई केली. ‘गदर २’ ने सहाव्या दिवशी ३२.३७ कोटी रुपये कमावले. ‘छावा’ने सहाव्या दिवशी ३२ कोटींची कमाई केली आहे. ‘अॅनिमल’ची सहाव्या दिवसाची कमाई २७.८ कोटी रुपये होती. तर ‘बाहुबली २’ ने सहाव्या दिवशी २६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. ‘स्त्री २’ ने सहाव्या दिवशी २५.८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. ‘पठाण’ने सहाव्या दिवशी २५.५ कोटी रुपये कमावले. ‘जवान’ने सहाव्या दिवशी २४ कोटी रुपये कमावले.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट आता २०० कोटींपासून एक इंच दूर आहे. गुरुवारी हा चित्रपट हा आकडा ओलांडेल. ‘छावा’ ज्या वेगाने प्रगती करत आहे ते पाहता, लवकरच तो ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.