कलाकार मंडळी जितके प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असतात तितकीच त्यांची मुलंही लोकप्रियता मिळवतात. कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबद्दल त्यांच्या मुलांबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना विशेष आवडत. कलाकार मंडळीही त्यांच्या मुलांबद्दल खास अपडेट चाहत्यांसह शेअर करत असतात. तर बऱ्याच कलाकार मंडळींची मुलं आहेत जी आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत पदार्पण करतात. यांत एका कुटुंबाच नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे बांदेकर कुटुंब. (Soham Bandekar Education)
१८ वर्षाहून अधिक काळ आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमातुन प्रेक्षकांची मन जिंकली. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ बाजूला काढत आणि गंमतीशीर खेळ खेळात समस्त महिला वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम आदेश बांदेकर करतात. महाराष्ट्राचे लाडके भावोजी अशी त्यांची संपूर्ण जगभरात ओळख आहे. या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. शिवाय अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही त्याने पेलवली आहे.

आदेश बांदेकर यांचे संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत सक्रिय आहे. त्यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या मराठी तसेच बॉलिवूडमध्येही विविध भूमिका साकारताना दिसतात. तर त्यांचा मुलगा सोहम बांदेकरने ही आई वडिलांपाठोपाठ अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय तो दिग्दर्शन देखील करत आहे. अनेक मराठी मालिकांमधून सोहमने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
सोहम सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. अनेकदा तो कुटुंबाबरोबर घालवतानाचा वेळ चाहत्यांसह शेअर करतो तर बरेचदा आपल्या व्यावसायिक आयुष्याची अपडेटदेखील तो देत असतो. नुकतेच त्याने आस्क मी क्वेक्शन हे सेशन इन्स्टाग्रामवर घेतले. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने त्याला, “तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे?”, असा प्रश्न विचारला, यावर सोहमने उत्तर देत, “काय योग्य आणि काय चूक हे जाणून घेण्यासाठी पुरेसे पात्र असं माझं शिक्षण आहे. आणि मला आशा आहे की ते पुरेसे आहे”, असं म्हटलं आहे.