बरीच कलाकार मंडळी अशी आहेत ज्यांना शुटिंगनिमित्त परदेश दौरा करावा लागतो. घरापासून, कुटुंबापासून बराच काळ दूर राहून ही कलाकार मंडळी प्रेक्षकांच मनोरंजन करण्यात कधीच अडखळत नाही. आलेल्या प्रत्येक संकटाना समोर जात ही कलाकार मंडळी आपलं काम नित्यनियमाने करत असतात. तरीही एक माणूस म्हणून या कलाकार मंडळींनाही मनं आहेत, त्यांनाही भावना आहेत. त्यामुळे एखादवेळेस परदेशी दौरा करताना ही कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबियांच्या आठवणीत भावुक होतात. अशाच एका अभिनेत्रीला मायदेशाच्या आठवणीत भावुक झालेलं पाहायला मिळालं. ही अभिनेत्री म्हणजे कविता मेढेकर. (Kavita Medhekar Emotional Post)
सध्या अनेक नाटकांचे परदेश दौरे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. परदेश दौऱ्यानिमित्तचे अनेक फोटोस, व्हिडीओस ही कलाकार मंडळी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करताना दिसतात. अशातच प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन निर्मित व अद्वैत दादरकर लिखित – दिग्दर्शित ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे परदेश दौरे सुरु आहेत. सध्या या नाटकाची संपूर्ण टीम अमेरिका दौरा करण्यात व्यस्त होती. नुकतेच या नाटकाचे अमेरिका येथील दौरे संपले असल्याचं समोर आलं आहे. हे दौरे संपल्या संपल्या नाटकातील एका कलाकाराची पोस्ट सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
या नाटकांत अभिनेत्री कविता मेढेकर आणि अभिनेते प्रशांत दामले ही सदाबहार जोडी पाहायला मिळाली. नाटकांत कविता मेढेकर यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. कविता मेढेकर यांनी नुकतीच केलेली एक इंस्टाग्राम पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेतेय. परदेशात नाटकानिमित्त गेलेल्या कविता या बरच दिवस झाल्यानंतर त्यांच्या घराला, कुटुंबाला मिस करत असल्याचं त्यांनी या पोस्टमधून सांगितलं आहे.
कविता यांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “३ आठवड्यांचा झंझावती व यशस्वी असा अमेरीकेचा नाटकाचा दौरा करून आता मायदेशी परतण्याचे वेध लागले आहेत. अगदी शेवटच्या क्षणाला मुलांच शॉपिंग झालं, बॅग्स भरून झाल्या. आता घर, आपली माणसं, सण असं सगळं साजरं करायचयं. भुवनेश्वरीच्या पात्रात विविध रंग भरायचेत. आजचा नवरात्रीचा रंग पांढरा आहे आणि मी शुभ्र पांढऱ्या ढगांबरोबर आजचा पांढरा रंग साजरा करत आहे.” असं कॅप्शन देत त्यांनी शुभ्र पांढऱ्या ढगांबरोबरचा एक पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे.